शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊचमधील पाणी आरोग्यासाठी घातक

By admin | Updated: May 22, 2015 01:24 IST

बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या पाण्याच्या पाऊचवर कुठेही बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद केली जात नाही.

चंद्रपूर : बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या पाण्याच्या पाऊचवर कुठेही बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद केली जात नाही. प्लास्टिकमध्ये बंद केलेले पाणी किती दिवस वापरता येते, याचेही निकष नाहीत. त्यामुळे पाऊचमधील पाणी मानवी आरोग्यासाठी धोक्याचे ठरत आहे. उन्हाची तीव्रता वाढली की पाणीटंचाईला सुरूवात होते. स्वच्छ पाण्याची उपलब्धता होत नसल्याने उन्हाळ्यात बाहेर फिरायला निघाल्यानंतर पाणी विकत घेऊन पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. यात मिनरल वॉटर, ड्रिकींग वॉटर या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या या बाटलीबंद पाण्याची मोठयÞा प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा पैसा करण्याचा व्यवसाय चांगलाच वाढीस लागल्याचेही दिसून येत आहे.एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत १५ ते २० रु पये आहे. गत काही दिवसांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्यांनीही बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. यावरून भारतात पाणीही विकले जाते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून लहान-मोठयÞा कंपन्या बाटलीबंद पाणी विकत असल्याचे दिसते. शहरात अनेक ठिकाणी पाणपोई असतानाही दुकानातून मिनरल वॉटरची विक्र ी होत आहे. प्रवाशीही आता बसस्थानकावर पाणपोईपेक्षा आरोग्याकरिता २० रुपयांची बॉटल विकत घेऊन आपली तहान भागविताना दिसतात; पण हे पाणी आरोग्याकरिता किती योग्य आहे, याची शहानिशा कुणीही करीत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)