शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची मोबाईल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:21 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व सार्वजनिक वापराचे पाणी नमुने गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत राबविली जात आहे.

ठळक मुद्देनेट कनेक्शनशिवाय माहिती अपडेट : जिल्ह्यातील १४,९९४ पाणी स्त्रोतांची तपासणी होणार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व सार्वजनिक वापराचे पाणी नमुने गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत राबविली जात आहे. ही मोहीम जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची वर्षातून दोनवेळा रासायनिक व जैविक तपासणी ही भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेकडील प्रयोगशाळेत केली जात असते. महाराष्ट्र रिमोट सेन्सींग अप्लीकेशन सेंटर नागपूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे अक्षांश आणि रेखांश व त्यांची ठिकाणे यांची अचुक माहिती मोबाईल अप्लीकेशनद्वारे घेण्यात आली आहे. १ मार्च २०१८ ते ३१ मे २०१८ दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे पाणी नमुने ग्रामसेवक, जलसुरक्षक, बीआरसी, पाणी गुणवत्ता सल्लागार यांच्या मदतीने गोळा करण्यात येणार आहेत. यात पाणी पुरवठा योजना, हातपंप, नळ योजना यांचा समावेश आहे. अशा एकूण १४ हजार ९९४ स्त्रोतांबद्दलची माहिती गोळा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींतर्गत कार्यरत असणाºया जल सुरक्षकांना मोबाईल अ‍ॅप हाताळणीचे तालुका स्तरावर प्रशिक्षण पाणी गुणवत्ता तज्ज्ञ अंजली डाहुले यांनी दिले आहे.

अशी आहे प्रक्रिया
या मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व गावातील पाणी स्त्रोतांची अद्यावत माहिती आहे. या अप्लीकेशनचा वापर करतेवेळी जीपीएस सुरू केल्यानंतर स्त्रोतांच्या १०० मीटर अंतरामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग बदलत जातो व त्यानंतर विस्तार अधिकारी, जलसुरक्षक, बीआरसी, उपविभागीय पाणी गुणवत्ता तज्ज्ञ किंवा अन्य अधिकारी व कर्मचारी यांना त्या स्त्रोतांचा फोटो काढून अपलोड करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी सोईस्कर व अद्यावत होणार आहे.
साथीच्या रोगांवर बसणार आळा
ग्रामीण भागातील सर्व स्त्रोतांची माहिती अद्यावत असल्यामुळे सर्व स्त्रोतांची वेळीच तपासणी करून व त्याची माहिती प्रयोगशाळेमार्फत तात्काळ आॅनलाईन केली जाईल. दूषित आढळलेल्या स्त्रोतांवर वेळीच उपाययोजना करून साथीच्या उद्रेकास आळा बसेल.
तालुकानिहाय पाण्याचे विविध स्रोत
बल्लारपूर-४२५, भद्रावती-४६४, ब्रह्मपुरी-१२९७, चंद्रपूर-८९३, चिमूर-१८९७, गोंडपिपरी-७२८, जिवती-४४०, कोरपना-७०८, मूल-११७४, नागभीड-१६१७, पोंभूर्णा-६८५, राजुरा-७७९, सावली-१४१४, सिंदेवाही-१२६०, वरोरा-१२१५ असे तालुकानिहाय पाणी स्रोत असून सर्वांचीच तपासणी करण्यात येणार आहे.