शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरात वंचित आघाडीला बहुमत, विरोधी गटाकडूनही माेर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या विसापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आरक्षण अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. ५ फेब्रुवारीला सरपंच ...

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या विसापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आरक्षण अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. ५ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निर्वाचित सदस्यांमधून मतदान होणार आहे.

सरपंचपदावर आपलाच विजय व्हावा म्हणून दोन्ही गटांकडून माेर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, वंचित आघाडीकडे बहुमत असल्याने या आघाडीच्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १७ सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये वंचित आघाडीचे नऊ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असल्याने येथील ग्रामपंचायतीची सत्तासूत्र वंचित आघाडीच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे; परंतु या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाप्रणीत आघाडीकडे ३, काँग्रेसप्रणीत आघाडीकडे २, शिवसेना २ व अपक्ष १ सदस्य असे एकूण ८ ग्रामपंचायत सदस्य विरोधी म्हणून आहेत. विरोधी गट एकत्र आले, तरी निर्णायक बहुमताचा आकडा जुळत नाही. मात्र, वंचित आघाडीतील एखादा सदस्य विरोधी गटात गेला तर त्यांचे संख्याबळ वाढू शकते. यासाठी उमेदवाराला प्रलाेभने देण्याच्या प्रस्तावाची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दोन्ही गट आपले सदस्य सुरक्षित ठेवून एकमेकांच्या गटातील उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात, असा अंदाज दिसत आहे.

सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असून, वंचित आघाडीकडे प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेल्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे तर भाजपा आघाडीकडे प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या सुवर्णा कुसराम या उमेदवार आहेत. यापैकी एकीच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार आहे. वंचित आघाडीकडे ९ सदस्यांचे बळ आहे. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत बहुमत आहे. फाेडाफाेडीच्या राजकारणामुळे चुरस वाढली आहे.