पशुचिकित्सालय पशुधन अधिकाऱ्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:01 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:01:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजोली : येथील पशुुचिकीत्सालयात पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी व ...

The veterinarian without a livestock officer | पशुचिकित्सालय पशुधन अधिकाऱ्याविना

पशुचिकित्सालय पशुधन अधिकाऱ्याविना

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजी : तातडीने नियुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
राजोली : येथील पशुुचिकीत्सालयात पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी व पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पशुधन अधिकाऱ्याचे रिक्त पद त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे.
राजोली येथील पशुचिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी म्हणून जीभकाटे कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत झाले. त्यानंतर हे पद भरण्यात आले नाही. या परिसरात शेतकरी तसेच पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनातर्फे शेतकरी व पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र येथे पशुधन अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने योजनांची प्रभावी अमंलबजाणी करण्यास अडचण जात आहे.
राजोली परिरात जोडधंदा म्हणून अनेकांनी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. अशा जनावरांना काही आजार जळल्यास उपचार करण्यास अडचण जात आहे. परिणामी जनावरे दगावण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील पशुधन विकास अधिकाºयाचे रिक्त पद त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व पशुपालकाकडून होत आहे.

शासनाने सुरू केलेल्या चांदा ते बादा योजनेतंर्गत येथे मोठया प्रमाणावर दुधाळू गायीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. परंतु, विकास अधिकाऱ्याअभावी गायीची तपासणी व औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याने खासगी उपचार करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.
- मंगल भेंडारे, लाभार्थी.

राजोली येथील पशुधन विकास अधिकाºयाचे पद रिक्त आहे. त्यामुळे शेतकरी व
पशुपालकांना अडचण जात आहे. लवकरच अधिकाऱ्याची नियुक्ती होणार असून त्याची प्रकीया जवळजवळ पूर्ण झाली आहे.
-निलेश खलाटे, पशुधन विकास अधिकारी,मूल

Web Title: The veterinarian without a livestock officer