शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे भाव कडाडले गृहणीचे बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देकांदा ७० रुपये किलो। आर्थिक गणित जुळविताना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी : यंदा पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला पिके उशीरा निघत असल्याने बाजारात अन्य राज्यांतून भाजीपाला आयात करावा लागत आहे. त्यामुळे सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात आवश्यक असणारा भाजीपाला कडाडल्याने सामान्य गृहीणींचे बजट बिघडले आहे. रोजीरोटीचा व्यवसाय करून हातावर आणून पानावर खाणाºया गरीब व सामान्य कुटुंबानचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिल्लर ग्राहकांना भाजीपाला प्रती पाव विकत घ्यावा लागत आहे. त्यातच कांद्याने ७० पार केल्याने मोठी पंचाईत होत आहे. त्यासोबच पालक १५ रुपये, अद्रक ३० रुपये, काकडी १० रुपये, तोंडळे १५ रुपये , सिमला मिर्ची २० रुपये, फूल कोबी २० रुपये, पत्ता कोबी १५ रुपए , ढेमस २० रुपये, सांबार ६० रुपये , मेथी २० रुपये, चवळी भाजी २० रुपये, कारले १५ रुपये, चवळी शेंगा २० ते २५ रुपये, टमाटर १५ रुपये, भेंडी १५ रुपये, वांगे २० रुपये, लौकी १० रुपये, गाजर ३० रुपये, बीट २० रुपये, कांदे २० रुपये, आलू सात रुपये, मेथी २५ ते ३० प्रमाणे कमीजास्त भावात भाजीपाला विकला जात आहे. त्यामुळे पूर्वी शंभर ते २०० रुपयात होणारा बाजाराला आता ४०० रुपये लागत आहेत.आपल्या भागात भेंडी, वांगे, चवळी, पालक हाच भाजीपाला पिकतो. आपल्याकडे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश वगैरे भागातून भाजीपाला येतो. शेतकऱ्यांचा भाजीपाला निघायचा असल्याने भावात थोडाफार फरक पडत आहे. शेतकºयांचा माल बाजारात आल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे.- गुलाब पाकमोडे, भाजीपाल्याचे ठोक व्यापारी,भद्रावती

टॅग्स :Marketबाजार