रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:44+5:30

घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वत: सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे.

Vacancies need to be arranged | रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच

रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच

Next
ठळक मुद्देपोलिसांनी कठोर व्हावे : अतिशहाण्यांना धडा शिकविणे झाले गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. असे असले तरी काही रिकामटेकडे युवक उगीच ये-जा करीत आहेत. पोलिसांशी वाद घालत आहेत. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे चित्र होते, ते सद्या नाही. यामुळे कोरोना विषाणुविषयी तज्ज्ञमंडळी जी भिती व्यक्त करीत आहेत, त्यांच्या भितीला व लॉकडाऊनला ही मंडळी हरताळ फासत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने तसेच पोलिसांनी कठोर होणे अत्यावश्यक झाले आहे.
घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वत: सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे.
सरकार, डॉक्टर, जेवढ्या काळजीने या रोगाविषयी सांगत आहेत. तेवढी काळजी ही मंडळी घेताना दिसत नाही. स्वत:चीच काळजी यांना नाही तर कुटुंबाची काळजी हे घेतली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक असतानाही दुचाकीवर दोघे-तिघे फिरत आहेत.
तंबाखू, गुटखा, दारूचे व्यसन असणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. अनेक पानटपरी चालक घरून व्यवसाय करीत आहेत. त्यांनीही गर्दीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. विनाकारण फिरणाºया तरुणांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. काहीजण सायंकाळी, सकाळी पूर्वीप्रमाणेच गप्पा मारीत आहेत. एक तासभर रस्त्यावर थांबले तर १५-२० दुचाकी जाताना येताना सहज दिसते. दुचाकी पकडणे, परवाना जप्त करणे, असा दंडात्मक उपाय केल्याशिवाय ऐकणार नाहीत. त्यामुळे आता कठोर होणे गरजेचे आहे.


स्वयंशिस्त महत्त्वाची
एका पोलीस ठाणे हद्दीत ५०-५० गावे आहेत. कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे ते कुठे-कुठे लक्ष देतील. स्वयंशिस्त पाळणे हाच मोठा कायदा आहे.
सोशल डिस्टनिंगला बगल
काही रिकामटेकडे घरात बसण्याऐवजी बाजारात फिरत आहेत तर भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी करीत आहे. किराणा सामान व मेडिकलमध्ये औषधी खरेदी करण्याच्या बहाण्याने लोक रस्त्यावर येत आहेत. शहरात भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी सोशल डिस्टनिंगला बगल देत आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली गर्दी करीत आहे.

Web Title: Vacancies need to be arranged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.