शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दारू व्यवसायातून बाहेर पडलेल्या त्रिकुटाच्या जिद्दीची अनोखी कहाणी

By admin | Updated: April 20, 2015 01:17 IST

जिद्दीला प्रयत्नांची जोड दिली की, कोणतेही कार्य सिद्धीला अगदी सहज नेता येते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर हजारो युवक बेरोजगार झाले.

रूपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)जिद्दीला प्रयत्नांची जोड दिली की, कोणतेही कार्य सिद्धीला अगदी सहज नेता येते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर हजारो युवक बेरोजगार झाले. काही अजुनही रोजगाराच्या शोधात आहेत, तर काहींनी दारूबंदीनंतर निर्माण झालेल्या बेरोजगारातून स्वत:ला सावरत रोजगार उभा केला. पूर्वी देशी दारूच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या भिवापूर वॉर्डातील तीन मित्रांच्या जिद्दीची कथाही अनोखी म्हणावी लागेल. आलेल्या बेरोजगारीमुळे निराश न होता या तिघांनी संयुक्तपणे लस्सी तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.मोहम्मद जमिर शेख, नितीन धुळे, कुशाल बारशेंगे अशी या जिद्दी युवकांची नावे असून ते येथील भिवापूर वॉर्डातील रहिवासी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने बालवयातच त्यांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागली. पुढे या तिघांपैकी दोघे भिवापूर वॉर्डातील एका देशी दारूच्या दुकानात काम करू लागले, तर एकाने त्याच दारू दुकानासमोर आमलेट विक्रीचे दुकान सुरू केले. यातून ते तिघेही कुटुंबाला आर्थिक मदत करीत असत. मात्र १ एप्रिपासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली अन् हजारो कामगारांसोबतच या तिघांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे जगण्याची विवंचना निर्माण झाली. काय करावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. मात्र ते पराभूत झाले नाहीत. मोहम्मद जमिर शेख, नितीन धुळे या तिघांनीही एकत्र येऊन विचार केला. कुणाकडे चाकरी करण्यापेक्षा आपण स्वत:चा व्यवसाय उभारावा काय, या प्रश्नाच्या उत्तरात तिघांकडूनही होकार मिळाला. तिघांनी स्वत:च्या खिशातून भांडवल गोळा केले. त्यातून लस्सी विक्रीच्या दुकानासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली आणि शहरातील शहीद हेमंत करकरे चौकात त्यांनी लस्सी विक्रीचे दुकान थाटले. यातून आता ते दररोज एक हजार रुपयांपर्यत व्यवसाय करतात. त्यातून तिघांचीही मजुरी निघते.लस्सीसोबतच ताक, मठ्ठा, लिंबू शरबत आदींचीही विक्री केली जात असल्याने या उन्हाळी व्यवसायातून हे तिघे युवक आर्थिक सुबत्ता प्राप्त करीत आहे.