साधनाभूमी (गोंदेडा) येथे नववर्षाचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST2021-01-04T04:23:47+5:302021-01-04T04:23:47+5:30

नववर्षाच्या निमित्याने साधनाश्रम गुंफा गोंदेडा येथे प्रा. नीलकंठ लोणबले यांच्या मार्गदर्शनात युवकांच्यावतीने स्वच्छता अभियान राबवून तथा स्वतः लागवड केलेल्या ...

Unique New Year's greetings at Sadhanabhoomi (Gondeda) | साधनाभूमी (गोंदेडा) येथे नववर्षाचे अनोखे स्वागत

साधनाभूमी (गोंदेडा) येथे नववर्षाचे अनोखे स्वागत

नववर्षाच्या निमित्याने साधनाश्रम गुंफा गोंदेडा येथे प्रा. नीलकंठ लोणबले यांच्या मार्गदर्शनात युवकांच्यावतीने स्वच्छता अभियान राबवून तथा स्वतः लागवड केलेल्या वृक्षांना पाणी देऊन वृक्ष संवर्धन करण्यात आले. कुठल्याही प्रकारचा जल्लोष अथवा आतषबाजी न करता अतिशय साध्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत गोंदेडा गावातील युवकांनी केले.

या उपक्रमात प्रा. चरडे, चिमूर, दोहतरे, प्रा. प्रकाश सोनुले, मुलचेरा, विकास सोनुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गावाच्यावतीने चंदू आत्राम, पुरुषोत्तम मगरे, महेश मगरे, मनोहर जीवतोडे, प्रशांत मांदाडे, अनुश्री लोनबले, किशोरी लोनबले, मिलन गजभे, रमेश दोडके तसेच इतर युवकांनी या उपक्रमात हिरीरीने सहभाग दर्शविला.

प्रा. नीळकंठ लोनबले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला असून ग्रामस्थांच्यावतीने ‘वन मॅन वन ट्री’चा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Web Title: Unique New Year's greetings at Sadhanabhoomi (Gondeda)