शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या निरुत्साहाने टक्केवारीला फटका

By admin | Updated: October 15, 2014 23:32 IST

चिमूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांचा मतदानासाठी अतिशय निरुत्साह दिसून आला. या मतदार संघातून सर्वाधिक २९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले. या क्रांतीभूमी म्हणून

७४-चिमूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांचा मतदानासाठी अतिशय निरुत्साह दिसून आला. या मतदार संघातून सर्वाधिक २९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले. या क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसह नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र सकाळपासून मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदानासाठी घराबाहेर निघण्याचे आवाहन केले जात होते. मात्र त्यालाही फार प्रतिसाद मिळाला नाही. संवेदनशिल अशी ओळख असलेल्या या मतदार संघात मतदान प्रक्रीयेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. या मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४.२९ टक्के मतदान झाले. दुपारनंतर गर्दी ओसरलीजिल्ह्याची मागणी असलेल्या चिमूरमध्ये यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निरूत्साह दाखविला. काहींनी जोपर्यंत जिल्हा होणार नाही, तोपर्यंत मतदानच न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा ऐकीवात आली. त्याचा परिणाम म्हणून दुपारनंतर मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली. विधानसभेत घटली टक्केवारीचिमूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीची टक्केवारी घटली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे विधानसभेतही तो उत्साह कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती अपेक्षा मात्र फोल ठरली. ५ वाजेपर्यंत केवळ ४५.२९ टक्के मतदानसध्या शेतातील कामे जोमात सुरू आहे. त्यामुळे मजूर वर्गासह शेतकरीही शेतातील कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यातच दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी शेतपीक काढण्याचे काम सुरू आहे. परिणामी चिमूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानावर फरक पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ४५.२९ टक्के मतदान झाले. अशीही जागृतीइंटरनेट आणि मोबाईलच्या युगातही मतदारांना जागृत करण्यासाठी तरूणांनी आपल्या डोक्यात कल्पना मोबाईलमध्ये उतरविल्या. आज दिवसभर अनेकांच्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे जनजागृतीचे संदेश सातत्याने पोहचविले जात होते. त्यामध्ये ‘माझे मत माझा अधिकार’, ‘माझ्या एका मताने नक्कीत फरक पडेल’, ‘आता हे राज्य तुमच्या हातात’, ‘परिक्षेत एका गुणाला, क्रीकेटमध्ये एका धावेला अन् लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते’, ‘मतदार ओळखपत्राचा उपयोग फक्त सीमकार्ड घेण्यासाठी नव्हे तर मतदानासाठी करा’, ‘मतदान करा देश घडवा’, एवढेच नव्हे तर ‘मतदान मेरा अधिकार-मतदान मेरी जिम्मेदारी’ अशा प्रकारचे संदेश मोबाईलद्वारे देण्यात येत होते.