जागेच्या वादावरून काकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST2021-05-16T04:26:45+5:302021-05-16T04:26:45+5:30

सिंदेवाही : घराच्या जागेवरून वाद झाला. यात रागाच्या भरात पुतण्याने आपल्या काकालाच काठीने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान काकाचा मृत्यू ...

Uncle's murder over a land dispute | जागेच्या वादावरून काकाची हत्या

जागेच्या वादावरून काकाची हत्या

सिंदेवाही : घराच्या जागेवरून वाद झाला. यात रागाच्या भरात पुतण्याने आपल्या काकालाच काठीने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान काकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या पुतण्याला काही तासातच सिंदेवाही पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी घडली.

दीपक झिटूजी वाढई (४०) रा. गुंजेवाही असे आरोपीचे नाव आहे तर मारोती गोविंदा वाढई (६५) रा. गुंजेवाही असे मृतकाचे नाव आहे. याबाबत जगदीश सोमेश्वर वाढई रा. गुंजेवाही यांनी सिंदेवाही पोलिसात तक्रार दिली आहे. पुतण्या दीपक झिटूजी वाढई याचे काका मारोती गोविंदा वाढई व त्यांचा मुलगा सतीश मारोती वाढई यांच्यासोबत घराच्या जागेच्या कारणावरुन भांडण झाले. यात दीपकने मारोती वाढई यांना काठीने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले. मारोती वाढई यांना उपचाराकरिता चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यातील आरोपी दीपक झिटूजी वाढई याच्या कपाळावर मार लागल्याने तो ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही येथे उपचार घेऊन पळून गेला. त्याचा शोध घेण्याकरिता पोलीस पथक गुंजेवाही य़ेथे रवाना करुन काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे हे करीत आहेत.

Web Title: Uncle's murder over a land dispute