शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज वाहिनी वस्तीतून नेण्यामागे अल्ट्राटेकचे कारस्थान

By admin | Updated: June 7, 2014 23:51 IST

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा   फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे कारस्थान असून निव्वळ खर्च वाचविण्यासाठी हा खटाटोप आहे, असा आरोप आज शनिवारी नांदा येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून केला. नांदा फाटा परिसरात सध्या २२0 केव्ही टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ही वाहिनी थेट वार्ड क्रमांक पाचमधून चालली आहे. या वाहिनीमुळे आपल्या वस्तीतील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे मत येथील नागरिकांचे आहे. या संदर्भात माहिती देताना प्रणबकुमार शहा म्हणाले, ही वाहिनी ज्या परिसरातून जाणार आहे, त्याखाली १५0 घरे आहे. नियमानुसार, मानवी वस्तीमधून उच्चदाब क्षमतेची वीज  वाहिनी नेता येत नाही. तसेच त्यासाठी वस्तीत मनोरेही उभारले जाऊ शकत नाहीत. तरीही मनोर्‍यांसाठी सपन बाला आणि किशोरसिंग राठोड यांच्या अंगणात खड्डे उभारण्यात आले आहेत. २२0 केव्ही वाहिनी या नागरिकांच्या घरावरुन गेल्यास त्याखाली वास्तव्य करणे जोखमीचे आहे. त्यामुळे वस्तीतून वाहिनी नेण्याला आपला विरोध आहे. या संदर्भात ५ जूनला जिल्हाधिकार्‍यांना भेटून निवेदन दिले असता, त्यांनी तात्पुरते काम थांबविण्याचे आणि उपविभागीय अधिकार्‍यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापारेषणचे अभियंता गाडगे यांनाही त्याच दिवशी भेटून नागरिकांनी निवेदन दिले. त्यांनीही काम थांबविण्याचे आणि सर्व्हेअरकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, टॉवरमुळे नागरिकांच्या जीवाला कसलाही धोका नसल्याचे सर्व्हेअरकडून  सांगितले जात आहे. अल्ट्राटेक कंपनी मनोर्‍यांच्या उभारणीचा खर्च वाचविण्यासाठी आपल्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही हे काम सुरू आहे. येथील सरपंच व उपसरपंच टॉवर उभारणीसाठी नागरिकांना विनंती करत आहेत. एवढेच नाही तर, यासाठी विरोध करणार्‍यांना कंपनीतील कामावरून काढले जात आहे. यावरून अल्ट्राटेक कंपनी दबावतंत्राचे धोरण आखत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या विरोधात आपण गावकर्‍यांसह आंदोलन उभारू, प्रसंगी आत्मदहनसुद्धा करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला पल्लव शहा, मिलन गोयल, प्रदीप हलधर, गोविंद राऊत, अनिल प्रसाद, अनिता गोयल, सुमन यादव, रंजीता सिंग आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)