शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद

By admin | Updated: September 30, 2014 23:35 IST

कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लखमापूर : कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जात होता. याचे मुख्य केंद्र गडचांदूर-भोयगाव मार्गावरील कवठाळा येथे आहे. या योजनेद्वारे १७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पाणी पुरवठ्याचा सामना या गावांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. १० वर्षापूर्वी या गावांसाठी सदर पाणी पुरवठा योजना सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाणी पुरवठा झाला व पाणीटंचाई रोखता आली. मात्र त्यानंतर आजतागायत पाईपलाईन, दुरुस्ती, पाईपलाईन विस्तार व गावातील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे नसली तरी ग्रामपंचायतीला कर भरावा लागत आहे. मात्र संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक हलबल झाले आहे. या गावातील महिला गावातील सार्वजनिक बोअरवेल, विहिरीतून काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा उपसा करीत आहेत. परंतु पाण्याचा साठा मुबलक नसल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर कुठे एकाच बोअरवेलवर गावातील सर्वच महिला पाण्यासाठी गोळा होत असल्याने तंटे वाढत आहेत. गावातील बोअरवेलही मोळकळीस आल्या आहेत. सदर गाव मुख्य मार्गावर असल्याने व लोकसंख्या बघता पाण्याचा साठा मुबलक असणे गरजेचे आहे. मात्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. (वार्ताहर)