ट्रकची झाडाला धडक, दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:41 IST2017-07-19T00:41:26+5:302017-07-19T00:41:26+5:30

महाराष्ट्र-तेलंगणा मुख्य मार्गावरील राजुरा तालुक्यातील सोन्डो गावाजवळ तेलंगणा राज्यातून येणारा ट्रक एका लोखंडी पुलाच्या डाव्या बाजूला झाडाला धडकला.

Truck tree hit, both killed | ट्रकची झाडाला धडक, दोघे ठार

ट्रकची झाडाला धडक, दोघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा : महाराष्ट्र-तेलंगणा मुख्य मार्गावरील राजुरा तालुक्यातील सोन्डो गावाजवळ तेलंगणा राज्यातून येणारा ट्रक एका लोखंडी पुलाच्या डाव्या बाजूला झाडाला धडकला. यानंतर तो रस्त्याच्या खाली उलटला. या अपघातात दोघे जण ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
अपघातात ट्रकमधील क्लीनर जागीच ठार झाला, तर वाहन चालक गंभीर जखमी झाला. जखमीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. प्रफुल्ल खोब्रागडे(३०) रा. सिंदेवाही व शकील शेख (३५) रा. भिवापूर-बाबूपेठ चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत. एमएच ३४ एबी ११७७ हा डी.एन.आर. कंपनीचा ट्रक आहे. घटनास्थळी दाखल होताच ट्रक मालकाने दिलेल्या माहितीवरून राजुरा पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Truck tree hit, both killed