राजुरा-आदिलाबाद मार्गावरून प्रवास करणे झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:17+5:30

जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Traveling on the Rajura-Adilabad route became dangerous | राजुरा-आदिलाबाद मार्गावरून प्रवास करणे झाले धोकादायक

राजुरा-आदिलाबाद मार्गावरून प्रवास करणे झाले धोकादायक

Next
ठळक मुद्देमहामार्ग अभियंत्याला निवेदन : नागरिकांना होतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : आदिलाबाद - कोरपणा- राजुरा या राष्ट्रीय महामार्गावरील राजुरा व कोरपना तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
या खड्ड्यांमुळे अनेकवेळा वाहतूक प्रभावित होत आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी या संदर्भात उपविभागीय अभियंत्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश सचिव ओम पवार यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदन दिले.

पळसगाव-हरणपायली मार्गावर चिखल
येनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-हरणपायली या मार्गावर चिखलाचे साम्राज्य असून नागरिकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे, येथूनच टॅक्टर तसेच इतरही वाहने जात असल्याने ंअनेकवेळा रस्त्यावर वाहने फसत असून मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्याने रेती अवैध वाहतूक सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा अडचणीचे होत आहे. त्यामुळे तस्करांवर आळा घालावा, अशी मागणी विकास माऊलीकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Traveling on the Rajura-Adilabad route became dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.