शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ताडाळी टोलनाका बंदीमुळे प्रवाशांत आनंद

By admin | Updated: March 29, 2015 01:15 IST

चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे ...

घोडपेठ : चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसोबतच खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांतही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.ताडाळी व ऊर्जाग्राम येथील प्रत्येकी एक व चंद्रपूर शहरातील दोन उड्डाणपुलांची टोलवसुली ताडाळी येथील टोलनाक्यावरून सुरु होती. ३२ कोटी रुपये खर्चून हे चार रेल्वे उड्डाणपुल बांधण्यात आले होते. मात्र बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या या टोलनाक्याची वसुली पुर्ण झाली नसल्याचे कारण पुढे करून प्रत्येक वेळी या टोलनाक्याची मुदत वाढविण्यात येत होती. २०२७ पर्यंत या टोलनाक्यावरून वसुलीची मुदत देण्यात आली होती. मात्र विधान परिषद सदस्या शोभाताई फडणविस यांनी स्वत: टोलनाक्याला भेट देवून पाहणी केली. या भेटीदरम्यान नाक्यावरील कर्मचारी बोगस पावत्या प्रवाशांना वितरित करीत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. २० टक्के संगणकीय पावत्या व उरलेल्या छापिल बोगस पावत्या वाहनधारकांना सर्रास वितरीत केल्या जात होत्या. या साऱ्या प्रकाराला आ.फडणवीस यांनी प्रखर विरोध केला. मुंबईस्थित सहकार ग्लोबल लिमी. या कंपनीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताडाळी टोलनाका रद्द करण्याच्या आदेशाबद्दल न्यायालयात अपील करून १ डिसेंबर २०१४ ला स्थगिती आणली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना जो आर्थिक भुर्दंड बसत होता त्याला लगाम लागला आहे. (वार्ताहर)