शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार केले. तसेच वाघाने शांताराम बोबडे नामक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड केल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देवाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी : आतापर्यंत सात जणांसह जनावरांचाही बळी

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रालगतच्या शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. आतापर्यंत सात शेतकरी व शेतमजुरांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. तर अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाल्याने शेतावर जाणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार केले. तसेच वाघाने शांताराम बोबडे नामक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड केल्याने अनर्थ टळला.शेतात जाणाऱ्या नागरिकांना जंगल परिसरात वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. पुन्हा वाघाने शेतकऱ्यांचा जीव जाण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजुरा व विरुर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.शेतीची कामे प्रभावितमागील काही दिवसांपासून राजुरा व विरुर क्षेत्रात वाघाचे दर्शन होत आहे. पोळ्याचा दिवशी दोघांवर वाघाने हल्ला केला होता. तसेच पाळीव जनावरांनाही ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या शेतीतील रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आहे. तसेच कपाशी व सोयाबीन आदी पिकांचे निंदण सुरु असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतावर जात आहेत. मात्र वाघाचे दर्शन होत असल्यामुळे शेतीची कामे प्रभावित झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघ