वाढोणा परिसरात वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:18+5:302021-07-08T04:19:18+5:30

ऊश्राळमेंढा येथील शेतकरी दुधाराम लांजेवार यांच्या गायीला व वालीदास सुकारे यांच्या म्हैशीला वाघाने गुराख्याच्या डोळ्यासमक्ष ठार केले. गुराख्याने गुरांना ...

Tiger poaching in the growing area | वाढोणा परिसरात वाघाचा धुमाकूळ

वाढोणा परिसरात वाघाचा धुमाकूळ

ऊश्राळमेंढा येथील शेतकरी दुधाराम लांजेवार यांच्या गायीला व वालीदास सुकारे यांच्या म्हैशीला वाघाने गुराख्याच्या डोळ्यासमक्ष ठार केले. गुराख्याने गुरांना रंगीचा तलाव परिसरात आणले. रमेश वाघाडे व गाय-म्हैशीला ठार करणारा हा एकच वाघ असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील आकापूर येथील एका गुराख्याला रात्री वाघाने ठार केले होते. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी येथील परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

कोट :-

गायी, म्हशीचा घेऊन दररोज ऊश्राळमेंढा व वाढोणा या गावांच्या मधोमध जंगल परिसरात रंगीचा तलाव भागात चराईसाठी जातो. माझ्या समक्ष वाघाने गाय व म्हशीला ठार केले. काही अंतरावर वाघ मांसावर ताव मारत होता. हे दृश्य डोळ्यादेखत बघत होतो.

- तुळशीदास तुमराम,

गुराखी, ऊश्राळमेंढा, ता.नागभीड, जि.चंद्रपूर.

Web Title: Tiger poaching in the growing area