शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा खुर्द परिसरात वाघाचा संचार, शेतकरी दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

शेतकऱ्याला भरपाई मिळावी, यासाठी प्रकरण वरिष्ठांकडे सादर केले आहे. रामपूर दीक्षित येथील मारोती खोब्रागडे व जाम तुकूम येथील आबू सुरजागडे यांच्या गायी कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी गेल्या होत्या. त्यांच्यावरही वाघाने हल्ला केला. देवाडा खुर्द येथील अंकूश बुरांडे यांच्या दोन गायी वाघाच्या तावडीतून बचावल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : देवाडा खुर्द व जामतुकूम परिसरात एक आठवड्यापासून वाघाचा संचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात तीन जनावरे ठारे तर दोन जनावरे जखमी केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून नागरिक दहशतीत आहेत.देवाडा खुर्द रामपूर दीक्षित, झुल्लुरवार तुकूम, गोमपाटील तुकूम, डोंगरहळदी, जामतुकूम, जामखुर्द, हत्तीबोडी परिसरातील जनावरे वनविभागाच्या कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी जातात. मागील आठवड्यात झुल्लुरवार तुकूम येथील शेतकरी पुरूषोत्तम बुरांडे यांची तीन जनावरे कक्ष क्र. ५१६ मध्ये चरण्यासाठी गेले असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाले.या घटनेची माहिती दिल्यानंतर वनरक्षक बी. बी. म्हस्के व क्षेत्र सहाय्यक डी. एन. ढोळे यांनी पंचनामा केला.शेतकऱ्याला भरपाई मिळावी, यासाठी प्रकरण वरिष्ठांकडे सादर केले आहे. रामपूर दीक्षित येथील मारोती खोब्रागडे व जाम तुकूम येथील आबू सुरजागडे यांच्या गायी कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी गेल्या होत्या. त्यांच्यावरही वाघाने हल्ला केला. देवाडा खुर्द येथील अंकूश बुरांडे यांच्या दोन गायी वाघाच्या तावडीतून बचावल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.मागील काही दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना घटना वाढत असल्याने शेतकरी व नागरिक दहशतीत आहेत. शेतीची कामे करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी गावकºयांनी निवेदनातून केली आहे.वन कक्ष क्र. ५२६, ५१६ मध्ये वाघाने हल्ला केल्याने दोन जनावरे ठार झाले. या घटनेचा पंचनामा करून भरपाईसाठी वरिष्ठ अधिकाºयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या परिसरात वाघाचे पगमार्क आढळले. वरिष्ठांच्या सुचनेनुसार कॅमेरे लावणे सुरू आहे.- बी. बी. म्हस्के,वनरक्षक, डोंगरहळदीरामपूर दीक्षित येथील वन संरक्षण समिती अंतर्गत २०१८-१९ मध्ये २५ हेक्टर जागेत वृक्ष लागवड झाली. वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी समितीचे सदस्य जात आहेत. मात्र, या परिसरात वाघाचा संचार सुरू आहे. त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा.- धनराज निमसरकार, सदस्य वनसरंक्षण समिती, रामपूर दीक्षित 

टॅग्स :Tigerवाघ