शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तीन आमदारांसह जि.प. अध्यक्ष बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

संपूर्ण खरिप हंगाम हातून गेला आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण खरिप हंगाम हातून गेला आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी सर्व आमदारांनी आपल्या क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पिकांचे सर्व्हेक्षण करून तातडीने आपादग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले.बंटी भांगडियांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देशनागभीड : चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी नागभीड तालुक्यातील पिकांची पाहणी करून झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. अवकाळी पावसाने नागभीड तालुक्यातील धान पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.याबाबतची माहिती आमदार भांगडिया यांना मिळताच सोमवारी पारडी, मिंडाळा जि.प.प्रभागातील देवपायली, बाळापूर या गावातील शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. ही पाहणी करीत असतांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, कोणताही शेतकरी नुकसानीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या.किशोर जोरगेवारही पोहचले शेतातचंद्रपूर : चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी नूकसानग्रस्त शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. शेतकºयांना प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा मोबदला देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापुढे मांडली. यावेळी मारडाचे सरपंच भारती कूडे, उसगाव सरपंच निवीता ठाकरे, धानोरा सरपंच छाया वासाडे, दाताळाचे सरपंच रविंद्र लोनगाडगे, पांढरकवडा सरपंच सुरेश तोतडे यांच्यासह गावकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर गेल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी शेतकºयांशी चर्चा केली.

टॅग्स :agricultureशेती