शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट लाखांचे, लावले साडेनऊ हजार वृक्ष

By admin | Updated: September 13, 2014 01:12 IST

मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीतील ११० गावात सन २०१४-१५ या चालु वर्षात एक लाख नऊ

मूल : मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीतील ११० गावात सन २०१४-१५ या चालु वर्षात एक लाख नऊ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीला रोपे न मिळाल्याने फक्त नऊ हजार ६३५ रोपांची लागवड करण्यात आली. त्यामुळे पंचायत समितीने या वर्षात ठरविलेल्या शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या वतीने शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ या वर्षात ४८ ग्रामपंचायतीच्या गावात एक लाख नऊ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात नलेश्वर व आकापूर हे गाव वगळता उर्वरित ४६ गावात फक्त ५० हजार २३० खड्डे खोदण्यात आले. एकूण उद्दीष्टाच्या ५० टक्के खड्डे खोदण्यात आले खरे; मात्र रोपाची लागवड करताना रोपे नसल्याने ग्रामपंचायतीची भंवेरी उडाली. पंचायत समितीने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र तालुक्यात व परिसरातील गावात रोपे नसल्याने वृक्ष लागवडीच्या कामाला ‘ब्रेक’ लागला. खड्डे खोदलेल्या फक्त १३ गावात कशीबशी जुळवाजुळव करून नऊ हजार ६३५ रोपे लावण्यात आली. उर्वरित खड्डे खोदले असतानादेखील त्या गावात एकही रोपे लावण्यात आली नाही. यात चिरोली, खालवसपेठ, टोलेवाही, चिखली, बोरचांदली, नलेश्वर उथळपेठ, सुशी, दाबगाव मक्ता, केळझर, कोसंबी, काटवन, गांगलवाडी, मोरवाही, आकापूर, चितेगाव, गडीसूर्ला, उश्राळा, भादुर्णी, बोडाळा, नांदगाव, गोवर्धन, बोडाळा बु., ननेगाव भुजला, बाबराळा, भेजगाव, पिपरी दीक्षित, चिचाळा चक, दुगाळा, हळदी, डोंगरगाव, फिस्कुटी या ३२ गावांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या मते, तालुक्यात रोपे उपलब्ध आहेत. रोपे उपलब्ध आहेत तर ती गेली कुठे, हा प्रश्न आहे. आता वृक्ष लागवडीसाठी बाहेरील जिल्ह्यातून रोपाची आयात केली जाणार असल्याचेही कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकंदरीत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ ही भूमिका पंचायत समिती मूल घेणार असल्याने गावांना काही काळ वाट पाहादवी लागणार आहे.एकंदरीत रोपाअभावी मूल तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला ग्रहण लागले आहे. यामुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होत आहे. (तालुका प्रतिनिधी)