शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

रोपवनात आग लागून हजारो रोपटे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे. त्यानंतर या रोपांचे संगोपन करण्याकरिता वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. परंतु रविवारी सकाळी सदर रोपवनात आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी गावातील वनामध्ये रविवारी आग लागली. या आगीत मागील वर्षी लावण्यात आलेली हजारो रोपटे जळाली. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यामध्ये हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे. त्यानंतर या रोपांचे संगोपन करण्याकरिता वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. परंतु रविवारी सकाळी सदर रोपवनात आग लागली. आगीमध्ये ५० हेक्टर जमिनीतील रोपे सापडले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचेपर्यंत संपूर्ण रोपवनाला आगीने वेढले होते. एक वर्षापूर्वी रोपवन तयार करण्यात आले. आता पावसाळा सुरू होणार असल्याने त्या रोपांचा वृक्षारोपणात मोठा फायदा होणार होता, हे विशेष.याच परिसरात झाले होते विना परवानगीने खोदकामज्या परिसरातील रोपवनाला आग लागली, त्या लगतच्या वनातील एका नाल्यावर विना परवानगीने सिमेंट बंधारा बांधण्यास सुरूवात करण्यात आली होती. खोदकाम करताना त्याच वनातील असंख्य झाडाची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी वनविभागााचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. अशातच आता रोपवनात आग लागल्याची घटना घडली.

टॅग्स :fireआग