पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:48 AM2019-08-31T00:48:48+5:302019-08-31T00:49:43+5:30

पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे.

Thousands of Pallas trees slaughtered for a hive | पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

Next
ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींकडून चिंता : पळस नामशेष होण्याच्या मार्गावर, नवीन पर्याय शोधावा

लोकमत न्यूज नेटवर्क
आयुध निर्माणी (भद्रावती) : पोळा सणादरम्यान मेढ्यासाठी बहुगुणी पळस वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बहुगुणी पळस वृक्षांची संख्या कमी होण्याची भिती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे.
पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे. पळस वृक्ष ग्रामीण भागातील जनतेसाठी संकटमोचक म्हणून ओळखला जातो. घराला छत म्हणून, भिंतीला पाणी लागू नये म्हणून, तर कधी पत्रावळी व द्रोण म्हणून पळसाच्या पानांचावापर होतो. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यास सुरक्षिततेसाठी पळस वृक्षाचा आधार घेतात. व्यावसायिक दृष्टयाही पळसाचे महत्त्व आहे. प्लास्टिक बंदीनंतर पळसाच्या पानाच्या पत्रावळी द्रोणची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातून बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. पळस झाडावर लाख निर्मिती केली जाते. शेतकरी पळसाच्या मुळापासून शेतीपयोगी दोर बनवितात. पळसामध्ये औषधी गुणधर्महीआहे. अनेक औषधांमध्ये पळसाचा वापर केल्या जाते. मात्र पोळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पळसाची अवैधपणे कत्तल केली जाते. निसर्ग प्रखर उन्हाळ्यात रखरखीत असतो तेव्हा पळसाची केशरी रंगाची फुले निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकत टाकतात. होळी सणात याच फुलांपासून रंगपंचमीचा रंग बनविण्याची प्रथा आहे. मात्र परंपरा जपताना निसर्गाचा समतोल ढासळणार नाही याचेही भान सुशिक्षित पिढीने ठेवणे आता गरजेचे झाले, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. शासनानेच पुढाकार घेऊन सणावारांच्या निमित्ताने होणारी बहुपयोगी पळसाची कत्तल थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Thousands of Pallas trees slaughtered for a hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.