शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

हजारो नागरिकांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प

By admin | Updated: March 20, 2016 00:54 IST

स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भद्रावती नगर परिषदेने क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.

भद्रावती : स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भद्रावती नगर परिषदेने क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे, या क्रीडा स्पर्धेला उपस्थित हजारो नागरिकांनी स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प केला. यासोबतच राज्यातून तथा विभागातून आलेल्या खेळाडूंचाही यात समावेश होता.नगर परिषद भद्रावतीद्वारे नागपूर विभागस्तरीय न.प.च्या नगराध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेचे स्थानिक निळकंठ शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. राज्याचे वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, आ. बाळू धानोरकर, खा. विनायक राऊत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव याप्रसंगी उपस्थित होते.या कार्याक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते. मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छतेच्या सप्तपदीची शपथ दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मी स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो, इथून याची सुरुवात झाली. माझे पहिले पाऊल सहभागाच्या ठाम निर्धाराचे, दुसरे पाऊल व्यापक लोकसहभाग मिळविण्याचे, तिसरे पाऊल १०० टक्के शौचालयाचाच वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे, चौथे पाऊल कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक करण्याचे, पाचवे पाऊल कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याचे, सहावे पाऊल सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे, सातवे पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचे असेल, अशा प्रकारच्या स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प हजारो नागरिकांनी घेतला. भद्रावती न.प.च्या स्वच्छतेबाबतच्या सकारात्मक विचाराबाबत हजारो नागरिकांनी आनंद व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)