शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे

By admin | Updated: March 21, 2016 00:42 IST

शाहु-फुले -आंबेडकर यांचे विचार हेच समाजाला खरी दिशा देऊ शकतात. कार्यक्रमामध्ये या महामानवांचे छायाचित्र लावून वंदन केल्यानेच होणार नसून...

मोरेश्वर टेमुर्डे : हिराचंद बोरकुटे यांचा पासष्टी सत्कार सोहळाचंद्रपूर : शाहु-फुले -आंबेडकर यांचे विचार हेच समाजाला खरी दिशा देऊ शकतात. कार्यक्रमामध्ये या महामानवांचे छायाचित्र लावून वंदन केल्यानेच होणार नसून त्यांची शिकवण परिपूर्णपणे अंगीकार करणे गरजेचे आहे. आज या महामानवाच्या विचाराला फाटा दिला जात आहे. हिराचंद बोरकुटे यांनी या महामानवाच्या विचाराला खऱ्या अर्थाने अंगीकारले. म्हणूनच आज त्यांचा हा सत्कार ठेवण्यात आला असून त्यांच्या पासष्टीनिमित्त त्यांना निरामय आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी व्यक्त केली.स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर येथे अ.भा. सत्यशोधक समाजातर्फे शुक्रवारी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष व पुरोगामी चळवळीचे नेते हिराचंद बोरकुटे यांच्या पासष्टीनिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे होते. या कार्यक्रमात हिराचंद बोरकुटे यांनी नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला. यावेळी मंचावर राकाँचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, शोभाताई पोटदुखे, दुधलकर गुरुजी, अशोक चोपडे, विजय चंदावार, आडकुपाटील नन्नावरे, किशोर पोतनवार, सुभाषसिंग गौर, बळीराज धोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अ‍ॅड. भगवान पाटील, सुभाष डांगे, विजय मोगरे, शशीकांत देशकर, डी.के. आरीकर, विनोद दत्तात्रेय, राजेंद्र वैद्य, केशव जेनेकर तसेच हिराचंद बोरकुटे व त्यांच्या धर्मपत्नी प्रमिला बोरकुटे या उपस्थित होत्या. याप्रसंगी सत्यशोधक समाजातर्फे हिराचंद बोरकुटे यांना शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि मानवस्त्र प्रदान करून त्यांचा व प्रमिला बोरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सत्काराप्रसंगी काढलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन प्रा.एस.टी. चिकटे यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी हिराचंद बोरकुटे यांच्या कार्याचा गौरव करणारे विचार व्यक्त केले. संचालन प्रा.एस.टी. चिकटे यांनी तर आभार डी.के. आरीकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)