शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन स्टंटबाजांना पाेलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST

चंद्रपूर : प्रजासत्ताकदिनी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूला असलेल्या एका चहा टपरीजवळ दुचाकीने स्टंटबाजी करणाऱ्या एका युवकाने आपल्या ...

चंद्रपूर : प्रजासत्ताकदिनी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूला असलेल्या एका चहा टपरीजवळ दुचाकीने स्टंटबाजी करणाऱ्या एका युवकाने आपल्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला मागावून धडक दिली होती. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल रफियत शेख (२१) रा. बल्लारपूर व उदयकुमार मधुकर ताटकोंडावार (५९) रा. वेकोलि काॅलनी शास्त्रीनगर दुर्गापूर अशी या स्टंटबाज आरोपींची नावे आहेत. अब्दुल रफियत शेख याने स्टंटबाजी करताना हरदीप जसपाल साहानी (४२) रा. हवेली गार्डन या दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी केले होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याची माहिती या घटनेने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देवीदास बावणकुळे यांनी सांगितले. उदयकुमार ताटकोंडावार हा वेकोलिमध्ये कार्यरत आहे. हा इसम दुचाकीवर स्टंटबाजी करीत येत होता. त्याला पाहून अब्दुल रफियत शेख हाही आपल्या दुचाकीवर स्टंटबाजी करू लागला; मात्र त्याचा तोल जाऊन त्याची दुचाकी आपल्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर धडकली. यामध्ये दुचाकीस्वार हरदीप जसपाल साहानी हे गंभीर जखमी झाले; मात्र स्टंटबाज जखमीला रुग्णालयात घेऊन जाण्याचे सोडून घटनास्थळावरून आपल्या दुचाकीने धूम ठोकत पसार झाले. स्टंटबाजांचेच मित्र आपल्या दुचाकीने या संपूर्ण घटनेचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करीत होते. हे चित्रीकरण व्हायरल झाल्याने या घटनेची भीषणता लक्षात आली. चंद्रपुरात अशाप्रकारे स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांच्याही मुसक्या आवळण्याची मागणी चंद्रपूरकर करू लागले आहेत.

‘तो’ नेहमीच करतो स्टंटबाजी

उदयकुमार ताटकोंडावार हा नेहमी कुठेही जाताना हात सोडून दुचाकी चालवितो. तो धावत्या वाहनावर उभा होतो. झोपतो. पंगतीत बसल्यासारखा सीटवर बसतो. या कसरतीसाठी तो ओळखल्या जातो. तो मूळचा सावलीचा असल्याचे समजते. सावलीतही बाजारपेठेतून वाहन चालविताना अशा कसरती करीत असल्याची माहिती आहे. त्याच्या या कसरतीमुळे एका गृहस्थाचा जीव जाण्याची वेळ आली होती.