शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ फुटपाथवरून पुन्हा रूग्णालयात

By admin | Updated: December 18, 2014 22:51 IST

उपचार पूर्ण झाले नसतानाही बरे झाल्याचे सांगून रूग्णांना बाहेर घालविणारे जिल्हा सामान्य रूग्णालय अखेर गुरूवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच वरमले. गंगाधर आणि भाऊराव नावाच्या या दोन्ही रूग्णांचा

रुग्णालयही वरमले : रुग्णवाहिकांनी घेतला गंगाराम आणि भाऊरावचा शोध गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर उपचार पूर्ण झाले नसतानाही बरे झाल्याचे सांगून रूग्णांना बाहेर घालविणारे जिल्हा सामान्य रूग्णालय अखेर गुरूवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच वरमले. गंगाधर आणि भाऊराव नावाच्या या दोन्ही रूग्णांचा महाकाली मंदीर परिसरात शोध घेऊन रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा उपचारासाठी रूग्णालयात नेले. ‘लोकमत’मध्ये या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. बातमीची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबिकर यांनी परिचारक व डॉक्टरांसह अँब्युलन्स रवाना केली. दरम्यान वृत्त वाचून या परिसरात अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते हजर झाले होते. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिरसकर यांनीही धाव घेतली होतीे. रूग्णालयाच्या पथकाने गंगाधार आणि भाऊराव या दोघांनाही अँब्युलन्समधून नेऊन उपचार सुरु केले आहेत. ‘लोकमत’मुळे गंगाधरला मिळाले नातेवाईकलोकमतमध्ये हे वृत्त प्रकाशित होताच गंगाधरचे छायाचित्र बघून ब्रम्हपुरी तालुक्यातील नितीन भरडकर नामक व्यक्ती महाकाली मंदीर परिसरात पोहचली. गंगाधरला बघून ते आपले मामा असल्याची ओळख त्यांना पटली. गंगधार हे आपले मामा असून ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडी येथील राहणारे आहेत. सात-आठ महिन्यांपूर्वी ते घरून निघून गेले होते. बऱ्याच ठिकाणी शोध घेऊनही सापडले नव्हते. ते हरविल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिसातही दिली होती, अशी माहिती भरडकर यांनी दिली. लोकमतमुळे आपले मामा मिळाले, असे भावोद्गारही त्यांनी काढले. दरम्यान दुपारी गंगाधरचा मुलगाही खेडीवरून पोहचला. प्राथमिक उपचारानंतर नातेवाईकांनी त्याला गावाकडे नेले.