शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

‘ते’ विद्यार्थी शाळाबाह्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:08 PM

कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला. मात्र सर्व पर्यायांचा वापर करूनही शाळा सुरु न झाल्याने गावकरी हताश झाले.

ठळक मुद्देपरीक्षेपासूनही वंचित : शासकीय धोरणाचा शासनालाच विसर

आशीष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला. मात्र सर्व पर्यायांचा वापर करूनही शाळा सुरु न झाल्याने गावकरी हताश झाले. गावकऱ्यांनी शेजारच्या शाळेत विद्यार्थ्यांना न पाठविल्याने विद्यार्थी वार्षिक परीक्षेपासून वंचित तर राहिलेच; शिवाय नवीन सत्र सुरू झाल्यानंतर एकही दिवस शाळेत गेले नाही. शासनधोरणामुळेच हे विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहे.२६ जूनला शाळेची पहिली घंटा वाजली. मागील सत्रात तब्बल तीन महिने विद्यार्थी शाळेत गेले नाही. गेडामगुडा येथील विद्यार्थी सतत शाळाबाह्य असून त्यांच्या पालकांना समजावून सांगण्याची जबाबदारी कोणताही अधिकारी घेत नसल्याचे दिसते. येथील ग्रामस्थ इतर कोणत्याची शाळेत आपले विद्यार्थी पाठविण्यास तयार नाही. मागील सत्रात शिक्षण विभाग, तेथील पूर्वीचे मुख्याध्यापक लहू नवले यांनी येथील विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठविण्यासाठी गावात जाऊन प्रयत्न केले.मात्र गावकºयांनी एकच निर्णय घेतल्याने शिक्षण विभागाची पंचाईत झाली आहे. आमची शाळा सुरु झाल्यावरच आमचे विद्यार्थी शाळेत जातील, असा पवित्रा येथील लोकांनी घेतला आहे. शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विद्यार्थी हुशार; मात्र शिक्षणात खंडगेडामगुडा शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षणात हुशार आहेत. मात्र शिक्षणात तीन महिन्यांचा खंड पडल्याने विद्यार्थ्यांसह पालक फार हताश झाले आहे. आज नाही तर उद्या माय-बाप सरकार निर्णय घेऊन किमान गुणवत्तेच्या आधारावर आमची शाळा सुरु करतील, या आशेवर असलेल्या गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे.शासन अनभिज्ञतीन महिन्यांपासून विद्यापर्थी शाळाबाह्य असून शासनास या गंभीर बाबीची कल्पना नसावी, ही मोठी शोकांतिका आहे. जिल्हास्तरावरून शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी येथे भेट देऊन अहवाल सादर करण्याची गरज आहे. आरटीईनुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य असू नये, असे शासनाचे धोरण असताना शासनालाच या धोरणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे.गावकऱ्यांना शाळेचा अभिमानजिल्हा परिषद शाळा गेडामगुडा या शाळेने विद्यार्थ्यांना चांगले घडविले आहे. पालकांनी स्वत:ची शाळा समजून शाळेला मोठे योगदान दिले आहे. शेकडो शिक्षकांनी शाळेला भेटी दिल्या आहे. लोकसहभागातून शाळा घडली असल्यामुळे शाळेविषयी गावकऱ्यांना अभिमान आहे. शाळेचा दर्जा उंचावलेला आहे. असे उत्तम वातावरण, गुणवत्ता व लोकसहभाग असताना शासनाने शाळा बंद केल्याने पालकांवर मोठा आघात झाला आहे.