लाठी परिसराचा होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:46+5:302021-07-07T04:34:46+5:30

जिल्हा परिषद निधीअंतर्गत सरांडी येथील अंतर्गत रस्ता एसटीबीटी ते सरांडी ॲप्रोच रोडचे बांधकाम, मौजा लाठी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय लाटी ...

There will be development of Lathi area | लाठी परिसराचा होणार विकास

लाठी परिसराचा होणार विकास

जिल्हा परिषद निधीअंतर्गत सरांडी येथील अंतर्गत रस्ता एसटीबीटी ते सरांडी ॲप्रोच रोडचे बांधकाम, मौजा लाठी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय लाटी येथील संरक्षण भिंत बांधकाम, स्थानिक निधीअंतर्गत समाज भवन बांधकाम करणे २० लाख रुपये, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरद्वारा ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत पारडी येथे सुधाकर मडपती यांच्या घरापासून ते भगवंतराव मडावी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम, वामनपल्ली येथे देवराव तलांडे यांच्या घरापासून अनुसयाबाई कोवे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी ६५ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी उपसरपंच साईनाथ कोडापे, सरपंच पोडसा देविदास सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशोक रेचनकर, माजी सरपंच सुमन गेडाम, अध्यक्ष युवक काँगेस कमिटी संतोष बंडावार, नामदेव सांगडे, ग्रामपंचायत सदस्य उमा मडावी, शालू तलांडे, फिरोज पठाण, सचिन फुलझाडे, धीरेंद्र नागापुरे, प्रकाश मडावी, नरेंद्र वाघाडे, आशीर्वाद पिपरे आदींची उपस्थिती होती.

060721\img-20210706-wa0154.jpg

फोटो

Web Title: There will be development of Lathi area