चटपांचे ठरले; युती व आघाडीचे मात्र अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:40+5:30

राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत निमकर राष्ट्रवादीकडून लढले. त्यांना काँग्रेसच्या तुलनेत निम्मीच मते मिळाली होती.

There were a lot of chatter; But the alliance and the alliance are obstructed | चटपांचे ठरले; युती व आघाडीचे मात्र अडले

चटपांचे ठरले; युती व आघाडीचे मात्र अडले

Next
ठळक मुद्देरणधुमाळी : दोन्ही धोटे आमने-सामने येणार वा नवा सामना रंगणार?

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिवती व कोरपना या अतिदुर्गम तालुक्यांचा समावेश असलेल्या राजुरा मतदार संघाची ही निवडणूक मतदारांना नवी राजकीय मेजवाणी देणारी ठरणार आहे. या मतदार संघात नेहमी तिरंगी लढतीचा सामना बघायला मिळाला आहे. आता होऊ घातलेली निवडणूकही याला अपवाद नसणार असे चित्र आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला उतरवते, यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत निमकर राष्ट्रवादीकडून लढले. त्यांना काँग्रेसच्या तुलनेत निम्मीच मते मिळाली होती.
यामुळे त्यांचा दावा पक्षश्रेष्ठी कितपत मान्य करतात हे बघण्यासारखे आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला असली तरी मते मात्र तुल्यबळ होती. या आधारे ही जागा काँग्रेसकडेच राहतील हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. असे झाल्यास माजी आमदार सुभाष धोटे हे पुन्हा मैदानात असतील. परंतु उमेदवारीची अधिकृत घोषणा होईपर्यंत निमकर प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, असेही सूत्राचे म्हणणे आहे.
युतीमध्येही फारसे आलबेल दिसत नाही. युतीमध्ये राजुरा मतदार संघ शिवसेनेकडेच असायचा. परंतु एकदाही शिवसेनेने ही जागा जिंकली नाही.
२०१४ च्या निवडणुकीत युतीचा काडीमोड झाल्याने भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले. यामध्ये भाजपने पहिल्याच निवडणुकीत ही जागा जिंकली.
यावेळी या जागेसाठी शिवसेनेकडून कोणीही पुढे न आल्याने या निवडणुकीत युतीमध्ये भाजपचा उमेदवार असेल हे स्पष्ट आहे. यावेळी भाजप विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्यावर बाजी लावते वा नवा उमेदवार पुढे आणते. याबाबत प्रतीक्षा कायम आहे. पक्षातील जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे व खुशाल बोंडे यांनी अप्रत्यक्ष दंड थोपटल्याने हा संभ्रम वाढला आहे. गेली निवडणूक अ‍ॅड. संजय धोटे यांनी जिंकली, परंतु मताधिक्य कमी होते. या निवडणुकीत पक्षाने धोका पत्करू नये, ही सबब पुढे करून हे दोनही इच्छुक पुढे आल्याचे बोलले जात आहे.
या अंतर्गत दावेदारीने राजुºयात भाजपचा चेहरा जुना की नवा हा पेच मतदारांमध्ये पडला आहे. युती आणि आघाडीला शह देण्यासाठी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप हे यावेळी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. काही महिन्यांपासून त्यांनीही जनसंपर्क वाढविला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदार संघात तिरंगी सामन्याचे संकेत दिसत आहे.
त्यामुळे तीन दिग्गजांची ही तिरंगी लढत मतदारांसाठी नवी मेजवाणी ठरणार असल्याने अन्य दोन उमेदवारांकडे जनता उत्सुकतेने बघत आहे.

मतदार संघातील आमदार
१९६२ व १९७२ - विठ्ठलराव धोटे (काँग्रेस)
१९६७ - श्रीहरी जीवतोडे - (अपक्ष )
१९७८ - बाबूराव मुसळे (जनता पार्टी)
१९८० व १९८५ - प्रभाकर मामुलकर (काँग्रेस)
१९९०,१९९५ व २००४-अ‍ॅड. वामनराव चटप(जनता दल)
१९९९ - सुदर्शन निमकर -(काँग्रेस)
२००९ -सुभाष धोटे (काँग्रेस)
२०१४ -अ‍ॅड. संजय धोटे (भाजप)

Web Title: There were a lot of chatter; But the alliance and the alliance are obstructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.