शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जीवनावर वैचारिक लेखन व्हायला हवे

By admin | Updated: February 15, 2015 00:48 IST

आदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते.

वसंत खेडेकर बल्लारपूरआदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते. आदिवासी साहित्यातून वैचारिकता प्रकट होणे गरजेचे आहे. यावर सर्व साहित्यीकांनी विचार करावा, असे मत वक्त्यांनी येथे जिल्हा साहित्य संमेलनात मांडले. दोन दिवसीय साहित्य संमेलन येथील सरदार पटेल महाविद्यालयात सुरू आहे. आज, ‘चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी साहित्य वर्तमान आणि भवितव्य’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात वक्त्यांनी आपले विचार मांडलेत. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यीका उषा किरण आत्राम होत्या. सुनील कुमरे, प्रा. राम वासेकर, प्रा. प्रकाश वट्टी, सुदर्शन दिवटे हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते.सुनील कुमरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लेखकांनी केलेल्या आदिवासी साहित्याची पूर्ण माहिती देत, उल्लेखनीय कादंबरी, काव्यसंग्रह, वैचारिक लेख, नाटक आणि ऐतिहासिक लेखन यांची समिक्षा केली. गैरआदिवासी लेखकांचे यासंदर्भात मोठे योगदान असल्याचे सांगत अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्रा. सुरेश द्वारशीवार, स्व. दादा देशकर यांच्या कादंबरीचा प्रामुख्याने उल्लेख केला. आदिवासी साहित्यीक हा केवळ लेखनापर्यंतच मर्यादित न राहता, त्यांनी आदिवासी चळवळीत सक्रीय भाग घ्यावा, असे आवाहनही केले. प्रा. राम वासेकर यांनी, आदिवासी साहित्यात आदिवासींचा हुंकार प्रगट व्हायला हवा. तसा तो दिसत नाही. तरीही डॉ. विनायक तुमराम, राजगडकर यांचे याबाबतचे कार्य उल्लेखनीय आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या जाणिवा जगासमोर येण्याकरीता वस्तुस्थितीवर लिहिण्याकरीता तरुण लेखकांनी पुढे यावे, असे म्हणाले. आदिवासी साहित्य लिखीत आणि अलिखीत अशा दोन स्वरुपात आहे असे, सांगत प्रा. प्रकाश वट्टी यांनी आदिवासींना मोठा इतिहास आहे. ते या प्रांतावर सत्ता गाजवून गेले आहे. त्यांचे कार्य साहित्यातून उमटवावे असे मत मांंडले. सुदर्शन दिवटे यांनी आदिवासींवरील कादंबरी प्रकार यावर प्रकाश टाकला. आदिवासींवर बऱ्याच कांबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. मात्र वैचारिकतेचा त्यात अभाव दिसून येतो. अ‍ॅड. साळवे यांची ‘एनकाऊंटर’ ही कादंबरी उजवी आहे. या कादंबरीत घटनांसोबत वैचारिक पातळी आहे, असे सांगितले.