शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

साता जन्माची साथ ही खरीच ! पतीच्या मृत्यूनंतर तिला नाही सहन झाला विरह; पंधरा तासातच सोडले प्राण

By राजेश भोजेकर | Updated: October 18, 2025 16:47 IST

Chandrapur : सिंदेवाही तालुक्यातील अंतरगावात हृदयद्रावक घटना

चंद्रपूर : पती-पत्नीच्या अतूट नात्याचं आणि अमर प्रेमाचं एक हळवं उदाहरण सिंदेवाही तालुक्यातील अंतरगावात घडले. पंधरा तासांच्या अल्प अवधीत पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. शालीकराम आडकुजी ठिकरे (वय ६५) आणि त्यांची पत्नी सिताबाई शालीकराम ठिकरे (वय ६०) हे दोघेही दोन मुलं, एक मुलगी, सुना आणि नातवंडे यांच्यासह आनंदी आयुष्य जगत होते.

शुक्रवारी दुपारी शालीकराम ठिकरे हे घरात आराम करत असताना अचानक बेशुद्ध पडले. पत्नी सिताबाईंनी आवाज दिला, पण प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पतीच्या निधनाने स्तब्ध झालेल्या सिताबाईंनी विरह सहन न होता दुसऱ्या दिवशी सकाळी प्राण सोडले.

शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ग्रामस्थ, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत दोघांचीही प्रेतयात्रा एकत्र काढण्यात आली. दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले.अंतरगावात या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, ठिकरे दाम्पत्याचं नातं अखेरच्या क्षणापर्यंत जिवंत राहिल्याचे उदाहरण गावाच्या स्मरणात दीर्घकाळ कोरले जाईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : True love: Wife dies within 15 hours of husband's death.

Web Summary : In a poignant display of enduring love, a couple from Antargaon, Chandrapur, died within 15 hours of each other. After the husband's sudden death, the wife couldn't bear the separation and passed away the next day. Their joint funeral moved the entire village.
टॅग्स :Deathमृत्यूmarriageलग्न