कोविड सहायता निधीसाठी शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST2021-05-11T04:29:50+5:302021-05-11T04:29:50+5:30

सोमवारी शिक्षण समितीची ऑनलाइन मीटिंग शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष रेखा कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला ...

Teachers will pay one day's salary for the Covid Assistance Fund | कोविड सहायता निधीसाठी शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन

कोविड सहायता निधीसाठी शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन

सोमवारी शिक्षण समितीची ऑनलाइन मीटिंग शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष रेखा कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला शिक्षण समितीचे माजी सभापती तथा सदस्य क्रिष्णा सहारे, सदस्य रणजीत सोयाम, योगिता डबले, मेघा नलगे, कल्पना पेचे निमंत्रित सदस्य जे. डी. पोटे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड आदींनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान वितरण, शिष्यवृत्ती वितरणासंदर्भात चर्चा झाली. दरम्यान, सदस्य क्रिष्णा सहारे यांनी शिक्षकांचा उदात्तहेतूचे कौतुक करून समितीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याचे सुचविले. त्यानंतर सर्व सदस्यांनी अभिनंदनाचा ठराव घेत जिल्ह्यातील शिक्षकांचे कौतुक केले. या ठरावाबाबत समितीचे निमंत्रित सदस्य जे. डी. पोटे यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Web Title: Teachers will pay one day's salary for the Covid Assistance Fund