शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साडेअकरा हजार सिंचन विहिरींचा लक्ष्यांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:46 IST

जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हजार ७०० विहिरींचा लक्षांक वाढवून दिल्याने सुमारे ११ हजार ५०० झाला आहे. २० जून २०२० पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या : ३० जून २०२० पर्यंत वाढविली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हजार ७०० विहिरींचा लक्षांक वाढवून दिल्याने सुमारे ११ हजार ५०० झाला आहे. २० जून २०२० पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली.सिंचन विहिर धडक कार्यक्रम अंतर्गत विविध निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ दिला जातो. ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. ११ सप्टेंबर २०१६ रोजी योजनेची सुरूवात झाली. जिल्ह्यातील सिंचनाची व्याप्ती कमी असल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पुढे येत आहे. मात्र, जिल्ह्याचे लक्षांक व शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्हा परिषद जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत विहिरींचा लाभ घेत असताना शेकडो शेतकºयांना अडचणी येत होत्या. परिणामी, योजनेविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. यावर पर्याय म्हणून नियोजन विभागाने जिल्ह्याच्या लक्षांकामध्ये १ हजार ७०० विहिरींनी वाढ केली. हे लक्षांक दोन टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटकाशेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम २०१६ पासून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १८ तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटका बसतो. काही अधिकारी कागदीघोडे नाचविण्यातच वेळ घालवितात. अंमलबजाणीत त्रुटी राहात असल्याने विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.टंचाईच्या झळाशेतातील विहिरींमधील पाण्याची पातळी खालावल्याने रबी पिक घेणारे शेतकरी सध्या हैराण झाले आहेत. विहिरींवरील कृषीपंप अर्धा ते एक तास चालविल्यानंतर पाण्याची पातळी पूर्ण कमी होते. पूढील महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे लक्षांक मंजूर करणे पूरेसे नाही तर सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम प्रामाणिकपणे राबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.