तळोधीचे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST2021-02-06T04:51:42+5:302021-02-06T04:51:42+5:30

सावरगाव : ...

Talodhi Primary Health Center without a doctor | तळोधीचे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना

तळोधीचे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना

सावरगाव : नागभिड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, शासनाने सावरगाव येथील ॲलोपॅथिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.एस. घोनमोडे यांना तेथे प्रभारी म्हणून रुजू केले आहे. परिणामी, सावरगाव येथील रुग्णांना फटका बसत आहे. शासनाच्या या निष्काळजीमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. नागभिड तालुक्यातील तळोधी हे सर्वात मोठे गाव आहे आणि अलीकडे अपर तालुका म्हणूनही घोषित झालेले आहे; मात्र तेही नावापुरतेच अस्तित्वात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभारही मोठा आहे. असे असताना येथील दोन्ही अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, ही बाब गंभीर आहे.

Web Title: Talodhi Primary Health Center without a doctor