प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंगमध्ये शपथविधी

By Admin | Updated: November 18, 2015 01:14 IST2015-11-18T01:14:47+5:302015-11-18T01:14:47+5:30

प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंग चंद्रपूर अंतर्गत चालू असलेल्या आर.एन.एन.एम. आणि आर.जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला.

Swearing in Prabhadevi School of Nursing | प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंगमध्ये शपथविधी

प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंगमध्ये शपथविधी


चंद्रपूर : प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंग चंद्रपूर अंतर्गत चालू असलेल्या आर.एन.एन.एम. आणि आर.जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अविनाश खैरे, नीना खैरे आणि शाळेच्या प्राचार्य शिल्पा जनबंधू, शिक्षिका सुमित्रा लोहकरे, अश्विनी आगलावे, निर्मला गोडघाटे, धनलक्ष्मी मेंढे, स्नेहल फुलकर व आर.ए.एन.एम. आणि आर.जी.एन.एम. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचा विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संस्था संचालक अविनाश खैरे यांनी सरस्वती माता व फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली व नीना खैरे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर प्राचार्य जनबंधू यांनी सर्व विद्यार्थ्यांना वर्तन्याची शपथ दिली. यावेळी उपस्थितांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्नेहल फुलकरे यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Swearing in Prabhadevi School of Nursing