मिरची सातऱ्यातून मजुरांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:31+5:30

नवरगाव परिसरामध्ये पाण्याचे पाहिजे तसे स्त्रोत नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धान उत्पादनानंतर मजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय शासनाच्या रोजगार हमीची कामेही येथे सुरु झाली नाहीत. त्यामुळे मजुरांना कामासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

Support the laborers through chilli sticks | मिरची सातऱ्यातून मजुरांना आधार

मिरची सातऱ्यातून मजुरांना आधार

ठळक मुद्देशेकडो हातांना काम : सावलीतील कामामुळे अनेकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : येथील मजुरांच्या हाताला सद्यस्थितीत शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर कुठलेच काम नसल्यामुळे बहुतांश मजुर मिरची सातऱ्यांच्या कामातून आपला उदरनिर्वाह भागवित आहे. विशेष म्हणजे, छताखाली सावलीत काम असल्यामुळे याकडे मजुरांचा अधिक कल आहे.
नवरगाव परिसरामध्ये पाण्याचे पाहिजे तसे स्त्रोत नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धान उत्पादनानंतर मजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय शासनाच्या रोजगार हमीची कामेही येथे सुरु झाली नाहीत. त्यामुळे मजुरांना कामासाठी भटकंतीची वेळ आली आहे. दरम्यान, ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा आहे असे शेतकरी तसेच राजस्थान येथील मिरची व्यापारी मिरचीची लागवड करतात. सध्या या मिरचीचे देठ (मुक्या) तोडण्यासाठी सातरा सुरु केला. यामध्ये मिरचीचे देठ तोडणाºया मजुरांना किलोमागे ११ रुपये मिळतात. त्यामुळे मजुरांचा ओढा याकडे वाढला असून पती-पत्नी मिळून दिवसाला ४०० रुपयांपर्यंत मजुरी मिळत आहे.

Web Title: Support the laborers through chilli sticks