शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रूग्णावर प्लाज्मा थेरीपीचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

सरकारनगर येथील डॉ. पी. संगीता व डॉ. टिपले यांच्या कोविड रूग्णालयात चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय कोरोना बाधित उपचाराकरिता दाखल झाला होता. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने ऑक्सिजनयुक्त बेडवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रूग्णाच्या कुटुंबीयांनी व्हेंटीलेटर बेड्स मिळावे, यासाठी अन्यत्र धावपळ सुरू केली. दरम्यान, डॉ. निशीकांत टिपले यांनी या रूग्णावर प्लाज्मा थेरीपी करण्याचा निर्णय घेतला. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिलीच घटना : प्रकृतीत सुधारणा झाल्याचा डॉक्टरांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील डॉ. पी. संगिता व डॉ. निशीकांत टिपले यांनी एका ५५ वर्षीय कोरोना रूग्णावर मंगळवारी प्लाज्मा थेरीपीचा यशस्वी प्रयोग केला. विशेष म्हणजे, थेरेपीनंतर पाच तासाताच रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. जिल्ह्यातील पहिलीच यशस्वी प्लाज्मा थेरीपी असल्याचा दावाही डॉ. निशीकांत टिपले यांनी केला आहे.सरकारनगर येथील डॉ. पी. संगीता व डॉ. टिपले यांच्या कोविड रूग्णालयात चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय कोरोना बाधित उपचाराकरिता दाखल झाला होता. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने ऑक्सिजनयुक्त बेडवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रूग्णाच्या कुटुंबीयांनी व्हेंटीलेटर बेड्स मिळावे, यासाठी अन्यत्र धावपळ सुरू केली. दरम्यान, डॉ. निशीकांत टिपले यांनी या रूग्णावर प्लाज्मा थेरीपी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व रूग्णालयातून प्लाज्मा घेण्यात आला. या रूग्णावर प्लाज्मा थेरीपी करण्यात आली. त्यानंतर पाच ते आठ तासांच्या आत रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. येत्या आठवडाभरात रूग्ण पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास डॉ. निशीकांत टिपले यांनी व्यक्त केला आहे. या थेरीपीसाठी डॉ. शिल्पा टिपले, डॉ. तोतडे, डॉ. हर्षल डॉ. साई, डॉ. सिद्धी आदींनी मोलाचे सहकार्य केले. 

चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय रूण कारोनाच्या उपचाराकरिता आमच्या रूग्णालयात दाखल झाला होता. रेमडेसिविर इंजेक्शन देऊनही रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आम्ही प्लाज्मा थेरीपी करण्याचा निर्णय घेतला. प्लाज्मा थेरीपी केल्यानंतर रूग्णाच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून येत आहे.-डॉ. निशीकांत टिपले, चंद्रपूर

काय आहे प्लाज्मा थेरपी?कोरोना विषाणूला हरवून जी सुदृढ झाली आहे. त्या व्यक्तीचे रक्त इतर रूग्णांचे जीव वाचवू शकते. एखादा विषाणू शरीरात शिरला की आपले शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करते. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक म्हणजे अ‍ॅन्टीबॉडीज होय. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपले शरीर विशिष्ट प्रकारच्या अ‍ॅन्टीबॉडीज तयार करतात. या अ‍ॅन्टीबॉडीज रक्तातल्या प्लाज्मामध्ये असतात. कोविडमुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्या जातात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या