शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या दबंगगिरीने दहशत

By admin | Updated: November 1, 2014 22:50 IST

या पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन म्हणून कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत तानाजी फत्के हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याच्या घटना

भद्रावती : या पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन म्हणून कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत तानाजी फत्के हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून त्यांच्याविषयी शहरातील नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अभिजीत फत्के हे पोलीस अधिकारी भद्रावती पोलीस ठाण्यात रूजू झाल्यानंतर त्यांनी कर्तव्याच्या नावाखाली नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप आहे. त्यामुळे याठिकाणी यापूर्वी नांदत असलेली शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेआधी उघडणाऱ्या आस्थापनापैकी याठिकाणच्या चार बार आणि रेस्टॉरेंटर कारवाई करताना त्यांनी ग्राहकांसह कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. त्याची चित्रफितही सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत बार असोसिएशनच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी फत्के यांना विचारणा केली असता, माझ्या हातून चुक झाल्याचे त्यांनी सांगीतले. परंतु त्यांनी हा शब्द काही तासातच फिरवून पुन्हा कारवाई करताना मारहाण सुरू केली. यात फुटपाथवरील दुकानदार, पानठेला चालक, काळी-पिवळी व आॅटो चालक तसेच पार्कींग केलेल्या दुचाकी चालकांना कारवाई दरम्यान चांगलाच चोप दिला. शहरात स्वतंत्र असे पार्कींग झोन नाही. त्यामुळे बाजारात दुचाकीने खरेदीसाठी गेलेला ग्राहक आपली दुचाकी मिळेल त्या जागेवर पार्कींग करीत असतो. त्यात त्यांची चुक नसताना त्यांना फत्के यांच्या असभ्य बोलण्याचा आणि मारहाणीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या वर्तनामुळे नागरिक दहशतीत आहेत. या अधिकाऱ्याला जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांनी समज द्यावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)