शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी देणेघेणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 00:52 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ९० टक्के सुटीवर फायबर क्रेट पुरविण्याची योजना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली.

कल्पना बोरकर यांचा आरोप : फायबर क्रेट पुरवठ्याची योजना नामंजूरचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ९० टक्के सुटीवर फायबर क्रेट पुरविण्याची योजना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर रितसर ई निविदा काढण्यात आली. आलेल्या दरास मान्यता देण्याकरिता स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी मनमानी करून ही योजना नामंजूर केल्याचा आरोप उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताची योजना असूनही ती नामंजूृर केल्याने अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला आहे.ज्या पुरवठाधारकास ही निविदा संमत झाली आहे, त्यांनी मागील वर्षी सन २०१४-१५ मध्ये महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाला शिलाई मशीनचा पुरवठा केला. मात्र चिमूर पंचायत समितीमधील काही मशीनमध्ये पायदान पुरविले नाही. त्यावर चर्चा होऊन संबंधित पुरवठाधारकाने आठ दिवसात पायदान पुरवठा करून द्यावा, असे ठरवून विषयाला मंजुरी देण्यात आली. वास्तविक मागील वर्षी महिला व बालकल्याण विभागाला पुरविण्यात आलेल्या शिलाई मशीनचा यावर्षी कृषी विभागाला पुरवठा होत असलेल्या फायबर क्रेटशी काहीच संबंध नसताना विरोधकांशी हातमिळवणी करून फायबर क्रेटचा पुरवठा अडविला. यावर सभेमध्ये उपस्थित सदस्यांची मते नोंदविण्यात आली. यामध्ये सात विरुध्द पाच सदस्यांनी फायबर क्रेट शेतकऱ्यांना तात्काळ पुरवठा करावा, असे नोंदविले. महत्त्वाचे म्हणजे अध्यक्षांनीही बाजुने मत नोंदविले. असे असताना प्रत्यक्षात कार्यवृत्तात एक महिन्यानंतर विषय नामंजूर करण्यात आला. विशेष असे की याच वर्धमान इंडस्ट्री, चंद्रपूरला २०१५-१६ या वित्तीय वर्षातील ९३ लाखांचे शिलाई मशीनचे टेंडर मंजूर केले आहे. त्यासोबतच पंचायत विभागाकडून घंटागाडी खरेदी, आरोग्य विभागाकडून साहित्य खरेदी याचेही टेंडर वर्धमान इंडस्ट्रीलाच आहे. त्याला अध्यक्षांचा विरोध नाही. असे असताना कृषी विभागाबाबतच वेगळा निकष का, असा सवाल कल्पना बोरकर यांनी उपस्थित केला आहे. (शहर प्रतिनिधी)