शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान

By admin | Updated: October 17, 2016 00:43 IST

मागील वर्षी वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीच्या सोयाबीनचा वापर केला होता.

शेतकऱ्यांंची दिवाळी अंधारात : ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी वरोरा : मागील वर्षी वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीच्या सोयाबीनचा वापर केला होता. या वाणाला प्रति हेक्टर आठ ते दहा क्विंटलचे उत्पादन मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षीही याच वाणाचा वापर केला. मात्र अतिवृष्टी झाल्याने एका कंपनीचे सोयाबीन पूर्णत: खराब झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी न करताच जनावरांना चारण्याकरिता मोकळे करून दिले. तर काही शेतकऱ्यांनी सोयाविन कापण्याच्या मानसिकतेतच नसल्याची दिसून येत आहे .सोयाबिन दिवाळीपूर्वी निघणारे मुख्य पीक असून दिवाळीची खरेदी सोयाबिनच्या विक्रीवर अवलंबून असते. तर मजुरांचे देणेघेणेही याच कालावधीत करायचे असते पण या वर्षी शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर सोयाबिनचे उत्पादन झाले नाही. परिणामी दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. शासनाने क्षतिग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षर्णे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांचा मोबदला दिवाळीपूर्वी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते यांनी केली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते जयंत टेमुर्डे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुका अध्यक्ष बंडू खारकर नगरसेवक, प्रदीप बुरान, नगरसेवक शांताराम लोहकरे, शहर अध्यक्ष राजू वरघने, उत्तम इंगोले, ग्रा. प. डोंगरगाव (रेल्वे) चे सरपंच राकेश काळे. जितेंद्र आसेकर ,विजय गौरकार, कार्तिक कामतवार, राहुल नगराळे, अमित फुलझेले, विशाल पारखी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सोयाबिन जाळून केला निषेधनिवेदन दिल्यानंतर सत्ताधारी पक्षावर रोष व्यक्त करीत शेतकऱ्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा कार्यकर्त्यांनी सोयाबिन जाळून शासनाचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच भाजप सरकारविरुद्ध नारेबाजी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)