शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागाचे सोलर कुंपण

By admin | Updated: October 8, 2014 23:23 IST

वनालगतच्या शेतात जावून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातून वन्यप्राणी व मानवात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी

वरोरा : वनालगतच्या शेतात जावून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातून वन्यप्राणी व मानवात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी वन विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील चार गावाशेजारील वनालगत १२ किलोमिटरचे पाच लाख ९८ हजार रुपये खर्च करुन प्रायोगिक तत्वावर सोलर कुंपन लावले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावे वनालगत आहेत. यासोबतच त्या गावातील नागरिकांच्या शेतीही वनालगत असल्याने वनातून वन्यप्राणी शेतातील पिकांना मागील कित्येक वर्षापासून हानी पोहचवीत आहे. वन्यप्राण्यांना हुसकविण्यासाठी शेतकरी जागल करीत असतात. परंतु वन्यप्राणी एकट्या शेतकऱ्याला जुमानत नाहीत. वन्यप्राणी शेतात मोठ्या प्रमाणात कळपाने जावून शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत उभ्या पिकाची नासाडी करतात. पिकाच्या नासाडीची नुकसान भरपाई वनविभागाकडून दिली जाते. त्यात शेतकऱ्याचे समाधान होत नाही. वन्यप्राणी शेतातील पिकाकडे जावू नये, यासाठी शेतातील कुंपनात विद्युत प्रवाह सोडणे, विषारी औषधी टाकून ठेवणे, यासारखे अघोरी प्रकार होत असल्याने वन्यप्राण्यासोबत, पाळीव प्राणी व शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसून प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर मात करण्यासाठी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत निंबाळा, शिवणी, वनपरिक्षेत्रअंतर्गत पांढरवाणी, वरोरा वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या केम व रामपूर अशा चार गावांतील वनालगत १२ किमीचे सोलर कुंपन उभारले आहे. या सोलर कुंपनाला वन्यप्राण्यांचा स्पर्श झाल्याबरोबर वन्यप्राण्यास जोरदार शॉक लागतो. त्यामुळे वन्यप्राणी माघारी फिरून पळून जातो. यामध्ये वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत नाही. या सोलर कुंपनामुळे शेतामधील वन्यप्राण्यांचा धुमाकूळ कमी झाला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येत्या काही दिवसांत सर्वच ठिकाणी वनालगत सोलर कुंपन उभारले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)