शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याविनाच ग्रामपंचायतीचे सामाजिक वनीकरण

By admin | Updated: December 20, 2014 00:59 IST

मूल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून शेकडो हेक्टर शेतजमिनीत वनराई फुलवली.

भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून शेकडो हेक्टर शेतजमिनीत वनराई फुलवली. मात्र या सामाजिक वनिकरणात चारचाकी वाहने व मजूर वर्ग जाण्याकरिता रस्ताच नसल्याने सामाजिक वनीकरणात जाण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी ग्रामपंचायतीचे लाखोंचे नुकसान होत आहे. भेजगाव ग्रामपंचायतीने गावाच्या शेकडो एकर चराई जमिनीवर सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर अंतर्गत सा.व. परिक्षेत्र मूल मार्फत सन १९८८ मध्ये स.क्र. १८९, ४१, ३६४ व ३६८ वर प्रति हेक्टर १६०० रोपे याप्रमाणे विविध प्रजातीच्या रोपाची लागवड करण्यात आली. आता हे रोेपवन उत्कृष्ट असून ग्रामपंचायतीमार्फत रोपवनाला संरक्षण दिले जात आहे.त्याचप्रमाणे सन १९८९ ला स.क्र. ३२५ मध्ये ८ हेक्टर क्षेत्रावर सामाजिक वनीकरण मूलद्वारा रोपवनाची योजना मंजूर करून शिसू १५८, केसीर ४१४४, सिरस १८२२ असे मिळून एकूण १२ हजार ८०० रोपाची लागवड केली व शासकीय नियमाप्रमाणे ते रोपवन ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आले आहे. रोपवनाला ग्रामस्थाचे सहकार्य लाभत असून रोपवनातील गवत, चारा व इतर लाकूड ग्रामपंचायतीच्या परवानगीने घेण्यात येते. दोन्ही रोपवने यशस्वी झाल्याने ग्रामपंचायतीने पुन्हा गावातील १४ हेक्टर चराई जागेवर रोपवन घेण्याकरिता सामाजिक वनिकरण विभागाला ठराव दिला. त्यानंतर १९९१ मध्ये मिश्र प्रजातींची १८ हजार ४०५ रोपवने लावण्यात आली. ग्रामपंचायतीने या रोपवनाच्या देखभालीकरिता महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करून एक चौकीदार नेमून देखभाल करणे सुरू केले आहे. या रोपवनाचे जंगलात रुपांतर झाले आहे. मात्र या रोपवनात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. (वार्ताहर)