चंदनखेडात समाज प्रबोधन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST2021-02-11T04:30:15+5:302021-02-11T04:30:15+5:30

पहिल्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छता, सर्व माना जमातीमधील बांधवांनी आपल्या रुढी परंपरेनुसार खण, (मूठपुजा) डायका कार्यक्रम पार पाडला. ...

Social awareness program in Chandankheda | चंदनखेडात समाज प्रबोधन कार्यक्रम

चंदनखेडात समाज प्रबोधन कार्यक्रम

पहिल्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छता, सर्व माना जमातीमधील बांधवांनी आपल्या रुढी परंपरेनुसार खण, (मूठपुजा) डायका कार्यक्रम पार पाडला. दुपारनंतर महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी माना जमातीचे प्रेरणास्थान राजमाता माॅ मानिका व महामानवांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आणि मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी चंदनखेडा येथील नवनिर्वाचित सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल हनवते होते. उद्घाटक म्हणून नयन जांभुळे, मार्गदर्शक गणेश हनवते, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते माधव नन्नावरे, बंडू निखाते, प्रकाश भरडे, सुशिला हनवते, नवनिर्वाचित सदस्य आशा नन्नावरे, रंजना हनवते आणि बहुसंख्य जमात बांधव व गावकरी उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल हनवते यांनी केले. संचालन प्रशांत नन्नावरे यांनी केले. मंगेश नन्नावरे यांनी आभार मानले.

Web Title: Social awareness program in Chandankheda