शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

एफडीसीएमच्या जंगलातून रेतीची तस्करी

By admin | Updated: May 22, 2015 01:20 IST

मध्यचांदा वनप्रकल्प अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे.

कोठारी : मध्यचांदा वनप्रकल्प अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. याकडे जाणीवपूर्वक वनकर्मचारी दुर्लक्ष करण्याचा देखावा निर्माण करीत आहेत.कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली क्षेत्रातील कक्ष क्र. ७, ८, ९ व १० मधील जंगलातील नाल्यातून रेतीची दिवसरात्र वाहतूक होत आहे. या क्षेत्रात बांबु कटाईचे काम नाल्याच्या लगत आहे. या कामावर मजूर रोज काम करीत असतात. रोज संबंधित वनरक्षक व वनपाल कामावर हजर असतात. तसे असतानाही मागील दोन महिन्यांपासून सतत नाल्यातून रेतीचा उपसा सुरू आहे. कुडेसावली वनक्षेत्राचा कारभार विपुल आत्राम यांच्याकडे असून त्याचे रेती तस्करासोबत साटेलोटे आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच या क्षेत्रातील नाले रेती उपसा करुन रिकामे होत आहेत. या अधिकाऱ्यांचे ट्रॅक्टर असून सदर ट्रॅक्टरने रोज रेतीचा उपसा करुन साठवणूक करुन तस्करांना विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या जंगल क्षेत्रातील नाल्याची परिस्थिती प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रेती वाहतुकीसाठी तयार रस्ते, नाल्यात खोल खड्डे, जागोजागी रेतीचा उपसा केल्याचे दिसून येते.रेती तस्करांसोबत हातमिळवणी करुन रेती वाहतूक करणाऱ्या वनपालाची प्रत्यक्ष चौकशी करावी. जंगल क्षेत्राची तपासणी करावी. त्याच क्षेत्रात सुरू असलेल्या बांबु कटाईची चौकशी करावी. म्हणजे अनेक अवैध कामाचा उलगडा होणार आहे. बांबु वाहतुकीसाठी स्वत: भाड्याने ट्रॅक्टर आणून कामे करणे व रात्री जंगली नाल्यातून रेतीचा उपसा करुन रेती तस्करांना विकणे, असा प्रकार सुरू आहे. (वार्ताहर)