शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (पीकेव्ही) विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ व वनविद्या महाविद्यालयात निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. हा संपूर्ण परिसर वनांनी व्यापला असल्यामुळे येथे लवकरच वनविद्या महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या दोन्ही बाबतींत  राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (पीकेव्ही) विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ व वनविद्या महाविद्यालयात निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. हा संपूर्ण परिसर वनांनी व्यापला असल्यामुळे येथे लवकरच वनविद्या महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या दोन्ही बाबतींत  राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे,  सभापती मंदा बाळबुधे, उपसभापती शीला कन्नाके, मधुकर मडावी, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. कोल्हे, डॉ. नागदेवते, डॉ. वेलादी, डॉ.  सिडाम, प्रकाश देवतळे, आदी उपस्थित होते.   यावेळी कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी दिनेश शेंडे व गुरुदास मसराम  पालकमंत्र्यांनी सत्कार केला.

१८२ कोटींचा प्रस्तावसिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर वनविद्या महाविद्यालय स्थापन झाल्यास वनउपजांपासून शेतीला पूरक औषधी निर्माण होईल. या विषयावर  वनविद्या महाविद्यालयात सखोल संशोधन केले जाईल. देशभरातील कृषी शास्त्रज्ञ येथे येण्यासाठी तयार आहेत. सिंदेवाही वनविद्या महाविद्यालय उभारण्यासाठी १८२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला, अशी माहितीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

 

टॅग्स :universityविद्यापीठ