शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीच्या खर्चात श्यामकुळे पुढे

By admin | Updated: July 24, 2014 23:46 IST

मतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी असा पाच वर्षांत १० कोटी रूपयांचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची बहुतेकांमध्ये अहमहिका लागत असली

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरमतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी असा पाच वर्षांत १० कोटी रूपयांचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची बहुतेकांमध्ये अहमहिका लागत असली तरी चालू आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यात आमदार नाना श्यामकुळे आघाडीवर आहेत. त्या खालोखाल राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा क्रमांक लागतो. तर, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी मात्र या वर्षात छदामही निधी खर्च केलेला नाही. यंदाच्या चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते जून-२०१४ अखेरची ही आमदार निधीतील खर्चाची स्थिती आहे. मात्र गतवर्षी एप्रिल-२०१३ ते मार्च-१४ या काळात जिल्ह्यातील सहाही आमदारांचा निधी १०० टक्के खर्च झाला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होवून जवळपास चार महिने उलटले आहे. तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत.चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांनी आपल्या मतदारसंघात ५९ कामे मंजूर केली आहेत. त्यांना एक कोटी ४१ लाख ३८ हजार रूपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या सर्व कामांवर मिळून एक कोटी १५ लाख ९० हजार रूपयांचा खर्च झाल्याची नोंद आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांनी सुचविलेल्या ४७ कामांवर २ कोटी रूपये निधी खर्च झाला आहे.निधीच्या खर्चाला मंजुरी देण्यात दुसरा क्रमांक राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा लागतो. त्यांनी आपल्या मतदार संघात २५ कामे मंजूर केली असून प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांची अंदाजित किंमत ६९ लाख १५ हजार रूपये आहे. मात्र या कामांवर अद्याप कसलाही खर्च झालेला नाही. गतवर्षी त्यांनी ६० कामे सुचविली होती. त्यावर २ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला होता.तिसरा क्रमांक चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा लागतो. गेल्या चार महिन्यात त्यांनी १४ कामे मंजूर केली असून त्याची प्रशासकीय किंमत २२ लाख ८८ हजार रूपये आहे. त्यांवर ६० लाख ७१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. गतवर्षी त्यांनी ५८ कामे मंजूर करून त्यावर २ कोटी रूपयांचा निधी खर्च केल्याची नोंद आहे. चवथा क्रमांक बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा लागतो. त्यांनी गेल्या चार महिन्यात जूनअखेरपर्यंत आपल्या मतदार संघात ११ कामे मंजूर केली आहेत. त्यासाठी २३ लाख ५९ हजार रूपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ६६ लाख ६३ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. त्यांनी मागील आर्थिक वर्षात ७२ कामे केली होती. त्यावर २ कोटी रूपयांचा खर्च झाला होता. पाचवा क्रमांक ब्रह्मपुरीचे आमदार अतुल देशकर यांचा लागतो. या वर्षात त्यांनी केवळ सहा कामे मंजूर केली. त्यासाठी १६ लाख ६१ हजार रूपयांची प्रशाकीय मंजुरी असून खर्च ६० हजार रूपयांचा झाला आहे. मागील वर्षी त्यांनी १२२ कामे मंजूर करून निधी पूर्णत: खर्च केला होता.खर्चात सहाव्या क्रमावर वरोऱ्याचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांचा क्रमांक लागतो. या आर्थिक वर्षात त्यांनी जूनअखेर एकाही कामांना मंजुरी न दिल्याने त्यांच्या नावे सध्यातरी शून्य कामे आहेत. अर्थातच कसलाही निधी खर्च झाला नाही. असे असले तरी, गतवर्षीच्या कामांसाठी ६२ लाख २१ हजार रूपयांचा निधी या चार महिन्यात खर्च झाल्याचे दाखविले जात आहे. मागील वर्षी त्यांनी मतदार संघात ५९ कामांना मंजुरी देवून २ कोटींचा निधी खर्च केला होता.