शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवापूर, पडझरीत ३० फुटांचे मचाण

By admin | Updated: March 25, 2015 01:30 IST

मूल वनपरिक्षेत्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या शिवापूर, पडझरी कक्ष क्र. ३२३ मधील मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे.

राजू गेडाम मूलमूल वनपरिक्षेत्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या शिवापूर, पडझरी कक्ष क्र. ३२३ मधील मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. घनदाट जंगल असल्याने अवैध वृक्षतोड, आग लावण्याचे प्रकार वाढत आहे. हे हेरुन वनविभागाने ३० फूट उंचीची मचाण उभारले आहे. या मचाणीद्वारे वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच अवैध शिकार करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मूल वनपरिक्षेत्र कार्यालय येत असल्याने बफर झोन परिसरातील मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त परिसर आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्याचा वावर आहे. या परिसरात नेहमी वन्य प्राणी आढळतात. येथील वन्यप्राण्यांवर देखरेख ठेवता यावी तसेच धनदाट जंगलात आग लावून वनसंपदा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास वेळीच बंदोबस्त करण्यासाठी तसेच वनसंपदा नष्ट होण्यापासून संरक्षण करण्यासाठी बफरझोन परिसरातील शिवापूर चक, पडझरी येथील कक्ष क्र. ३२३, मध्ये ३० फूट उंचीचे मचाण उभारण्यात आली आहे. या मचाणीवर बसून वन्यप्राण्याबरोबरच आगीचेदेखील निरीक्षण करता येणार आहे. याच कक्ष क्र. ३२३ जवळच येथील वनमजूर भिकाऊ शेंडे यांनी वनकुटी निर्माण केली आहे. या वनकुटीत जवळपास चार ते पाच वनमजूर रात्रभर जंगलात राहून वन्यप्राण्यांच्या देखरेखीबरोबरच वनसंपदेचे रक्षणसुद्धा केले जात आहे. जंगल व्याप्त परिसर असला तरी सदर परिसर सुखकारक व दिलासा देणारा असल्याने रविवार अथवा इतर दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रममाणात पर्यटक भेट देतात.जंगलात उभारलेल्या मचाणीवरूनही पर्यटक वन्यप्राणी बघण्याचा आनंद घेत आहे. या घनदाट जंगलात वन्यप्राण्यांसोबत अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरूही मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाने वाव दिल्यास पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.