शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शारदा पॉवर प्लाँटने केले चिमूर भारनियमनमुक्त

By admin | Updated: April 18, 2015 01:18 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे चिमूर शहरासह गावखेड्यातही विजेची मागणी वाढली आहे.

चिमूर : वाढत्या लोकसंख्येमुळे चिमूर शहरासह गावखेड्यातही विजेची मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात मात्र विजेचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला भारनियमन काही तासाचे करावे लागत आहे. भारनियमनातून जनतेची मुक्तता करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. मात्र चिमूरमध्ये मागील तीन वर्षांपासून १० मेगावॅटची वीज निर्मिती करणाऱ्या शारदा पॉवर प्लाँटने मात्र चिमूर शहराला भारनियमातून सुटका केली आहे.खनिज संपत्तीने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारीत अनेक उद्योग आहेत तर जिल्ह्याला वीज उत्पादन करणारा जिल्हा म्हणूनही ओळखल्या जाते. मात्र वीज उत्पादन करूनही जिल्ह्यात आठ-आठ तासाचे भारनियमन केले जाते. या भारनियमनातून बाहेर निघण्यासाठी वीज कंपनीने सिंगल फेज योजना राबवून ग्रामीण जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला होता. तरीही वीज कंपनी सातत्याने विजेच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.उद्योगविरहीत असलेल्या चिमूर तालुक्यात एकमात्र उद्योग शारदा पॉवर प्लाँटच्या माध्यमातून ३० जून २००८ मध्ये १६ एकर परिसरात प्लाँट सुरू करण्यात आला. या प्लाँटमध्ये १० मेगावॅट वीज तयार करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे निरूपयोगी वस्तू यसे धानाचा कोंडा, कुटार, पऱ्हाटीचे फने इत्यादी वापरून वीज तयार केली जात आहे. यासाठी प्लाँटमध्ये रोज ४० ट्रक वेस्ट मटेरियल वापरल्या जातो. या मटेरियलमुळे २८० शेतकऱ्यांचा परिवारांना दिलासा मिळाला आहे तर शेतकऱ्यांच्या या वेस्टेज मटेरियलला पॉवर प्लांटमुळे मागणी वाढून आर्थिक लाभ झाला आहे. हे सर्व सुरळीत सुरू असताना मे २०१३ मध्ये हा प्लाँट काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडला. या दरम्यान प्लाँटचे आठ कोटीचे नुकसान झाले. त्यानंतर फेब्रुवारीपासून हा प्लांट आणखी चिमूरवासीयांच्या सेवेत दाखल झाला आहे. (शहर प्रतिनिधी)