शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी केलेल्या सात हजार शेतकऱ्यांनी कापूस विकलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST

वरोरा : हमीभावाने पणन महासंघाने राज्यातील अनेक केंद्रावर कापूस खरेदी केला. कापूस खरेदी १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर, ...

वरोरा : हमीभावाने पणन महासंघाने राज्यातील अनेक केंद्रावर कापूस खरेदी केला. कापूस खरेदी १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर, या हंगामातील हमीभावाने कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे, पण महासंघाकडे नोंदणी केलेल्या सात हजार शेतकऱ्यांनी अजूनही कापूस अद्यापही विक्रीकरिता आणलेला नाही.

हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार २५६ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे ७४ हजार १२५ क्विंटल कापसाची विक्री केली. सात हजार ६२ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीकरिता अद्यापही कापूस आणलेला नाही. बाजार समितीच्या वतीने सदर शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला जातो, परंतु शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. आता या शेतकऱ्यांचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे.

उलट खासगी जिनिंगमध्ये २२ हजार ८२३ शेतकऱ्यांनी दोन लाख ९३ हजार क्विंटल कापूस विकला आहे. खासगी जिनिंग व पणन महासंघाच्या दरामध्ये मध्यंतरी अधिक फरक नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जिनिंगमध्ये कापूस विकल्याचे मानले जात आहे. पणन महासंघाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कापूस विकल्याचे दिसून येत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपूर्वी स्वामी जिनिंग माडा रोड येथे शेतकऱ्यांनी कापूस विक्री आणावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे यांनी केले आहे.