शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सात संशयित पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: November 18, 2015 01:04 IST

शहरातील ऊर्जानगर भागातील राष्ट्रवादीनगरमध्ये रविवारी रात्री दोन घरी दरोडा घालून चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

राष्ट्रवादीनगरातील दरोडा : पालकमंत्र्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्रचंद्रपूर : शहरातील ऊर्जानगर भागातील राष्ट्रवादीनगरमध्ये रविवारी रात्री दोन घरी दरोडा घालून चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. सामान्य नागरिकांना हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध जारी केला असून घटनेनंतर दुर्गापूर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून विचारपूस केली जात आहे. असे असले तरी या दरोडा प्रकरणाचा अद्याप ठोस धागादोरा पोलिसांना गवसला नाही. रविवारी रात्री राष्ट्रवादीनगरमधील महेश भानारकर, करण कुंभारे यांच्या घरात दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर अक्षरश: धुमाकूळ घातला. घरातील सर्वांना एका खोलित बंद करून दरोडेखोरांनी घरात हात साफ केला. या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच आता दरोड्यासारख्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून तपासणी केली. (प्रतिनिधी)फोन न लागल्याने गफलतकुंभारे व भानारकर यांच्या घरात दरोडेखोर शिरून असताना नागरिकांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात दूरध्वनी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तो फोन लागत नसल्याने अखेर त्रस्त होऊन रामनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. रामनगर पोलिसांनी लगेच वायरलेसवरून दुर्गापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने दुर्गापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. मात्र तोवर दरोडेखोर पसार झाले होते, असे नागरिकांनी सांगितले. सूचना मिळताच, रामनगर पोलीस जर घटनास्थळी पोहचले असते, तर कदाचित दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मुनगंटीवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्रराज्याचे वन व वित्त नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेची तातडीने दखल घेत गृह खाते असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. या घटनेवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.